सहा दिवसांच्या तेजीला ब्रेक
By Admin | Updated: October 28, 2014 01:40 IST2014-10-28T01:40:26+5:302014-10-28T01:40:26+5:30
सहा दिवसांच्या तेजीनंतर सोमवारी शेअर बाजार कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा निफ्टी 98 अंकांनी खाली येऊन 26,752.90 अंकांवर बंद झाला.

सहा दिवसांच्या तेजीला ब्रेक
मुंबई : सहा दिवसांच्या तेजीनंतर सोमवारी शेअर बाजार कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा निफ्टी 98 अंकांनी खाली येऊन 26,752.90 अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 23 अंकांनी कोसळून 8 हजार अंकांच्या खाली बंद झाला.
एचयूएल, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या ब्ल्यूचिप कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याने सेन्सेक्सला फटका बसला. पत धोरण जाहीर करण्यासाठी अमेरिकी फेडरल रिझव्र्हची 28 ऑक्टोबरला दोनदिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीच्या आधी बाजारात सतर्कतेचे वातावरण आहे. त्यामुळे ही घसरण झाली असल्याचे सूत्रंनी सांगितले. याशिवाय गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिले. त्यामुळे बाजारात विक्रीला ऊत आला होता. आशियाई बाजारातील संमिश्र, तर युरोपीय बाजारातील नरमाईचा कल आणि जर्मनीतील व्यवसाय कमजोर पडत असल्याच्या बातम्या याचा एकत्रित परिणाम बाजारावर दिसून आला.
तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घट दिसून आली. एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्रतील कंपन्यांनाही फटका बसला. या उलट टिकाऊ ग्राहक वस्तू, भांडवली वस्तू, बँकिंग आणि ऊर्जा या क्षेत्रतील कंपन्यांचे शेअर्स वर चढले.
30 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सची सुरुवात चांगली झाली होती. एका क्षणी सेन्सेक्स 26,994.96 अंकांर्पयत पोहोचला होता. तो 27 हजारांचा टप्पा गाठील, असे वाटत असतानाच विक्रीचा जोर वाढला. त्यामुळे घसरणीला सुरुवात झाली. दिवसअखेरीस तो 26,752.90 अंकांवर बंद झाला. 98.15 अंक अथवा 0.37 अंकांची घसरण सेन्सेक्सला सोसावी लागली. गेल्या पाच सत्रंपासून सेन्सेक्स तेजीत होता. या पाच दिवसांत त्याने 851.71 अंक कमावले होते. ही वाढ तब्बल 3.28 टक्के होती. या तेजीला आता ब्रेक लागला आहे.
व्यापक आधार असलेला सीएनएक्स निफ्टी 22.85 अंकांनी अथवा 0.29 टक्क्यांनी कोसळून 7,991.70 अंकांवर बंद झाला.
बाजारातील सूत्रंनी सांगितले की, 30 ऑक्टोबरला संपणा:या डेरिव्हेटिव्ह सौद्यांच्या पाश्र्वभूमीवर गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिले. त्यामुळे बाजाराच्या धारणोवर परिणाम झाला. (प्रतिनिधी)
1,609 कंपन्यांचे शेअर्स कोसळले
च्बाजाराचा एकूण व्याप नकारात्मक राहिला. बाजाराचा विस्तार घटल्याचे दिसले. 1,609 कंपन्यांचे शेअर्स कोसळले, तर 1,245 कंपन्यांचे शेअर्स वर चढले.
च्बाजाराची एकूण उलाढाल मात्र 2,612 कोटींवर पोहोचली. मागील गुरुवारी ती 650.71 कोटी होती.
च्आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. चीनची अर्थव्यवस्था मंदीच्या विळख्यात सापडत असल्याचे वृत्त आल्यामुळे चीन, हाँगकाँग आणि तैवान येथील बाजार 0.21 टक्के ते 0.68 टक्क्यांनी कोसळले.
च्जपान आणि सिंगापूर येथील बाजार मात्र 0.11 टक्के ते 0.63 टक्क्के वर चढले.
च्युरोपीय बाजार सकाळच्या सत्रत खाली चालत होते. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार 0.11 टक्के ते 0.47 टक्क्यांनी खाली आले होते.