घोलवड केंद्रात रुग्णांचे हाल

By Admin | Updated: October 6, 2014 03:33 IST2014-10-06T03:33:11+5:302014-10-06T03:33:11+5:30

ग्रामीण भागात सेवा देण्यास डॉक्टरांच्या आडमुठ्या धोरणाचा फटका घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रास बसला आहे.

The situation of the patients in Gholavada center | घोलवड केंद्रात रुग्णांचे हाल

घोलवड केंद्रात रुग्णांचे हाल

बोर्डी : ग्रामीण भागात सेवा देण्यास डॉक्टरांच्या आडमुठ्या धोरणाचा फटका घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रास बसला आहे. आदिवासींना उपचाराकरीता ताटकळत बसावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्यास शहरातील डॉक्टरांची नापसंती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षभरापासून दोन एम.बी.बी.एस, एक बी.ए.एम.एस पद रिक्त आहे. सदर केंद्रातील सुमारे वीस गावातील विविध पाड्यावरील पन्नास हजार आदिवासी रुग्णांच्या वैद्यकीय सेवा सुविधेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्हापरिषद आयुर्वेदिक दवाखाना चिखले येथील डॉ. बी. सी. खेडकर घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रास अतिरिक्त सेवा देत आहेत. मात्र चिखले गावातील रुग्णांना सकाळपासून दुपारपर्यंत ताटकळत बसावे लागते. नाईलाजास्तव खाजगी दवाखान्याची पायरी चढून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. आदिवासींच्या खिशाला परवडणारे नाही. कडक उन्हामुळे रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. तान्ही मुलं, गर्भवती महिला, स्तनदामाता महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीकांचा समावेश आहे. दरम्यान जिल्हापरिषदेची बरखास्ती, विधानसभा निवडणुक, आचारसंहिता व प्रचाराची रणधुमाळी आदीमुळे समस्येचे निराकरण करण्यात लोकप्रतिनिधी उत्सुक नसल्याचे दिसत आहे. उपचाराअभावी आदिवासी रुग्णांचा मृत्यू झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)

Web Title: The situation of the patients in Gholavada center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.