शिक्षणाच्या स्वप्नाकरिता भावंडे करताहेत सफाईची कामे
By Admin | Updated: February 22, 2015 22:25 IST2015-02-22T22:25:43+5:302015-02-22T22:25:43+5:30
मुले ही देवाघरची फुले आहेत, असे बोलले जाते. समाजातील सर्वच घटकांतील मुलांनी शिक्षणापासून वंचित न राहता शिक्षणाच्या प्रवाहात येवून स्वत:सोबत राष्ट्राच्या प्रगतीतील एक हिस्सा बनले पाहिजे,

शिक्षणाच्या स्वप्नाकरिता भावंडे करताहेत सफाईची कामे
अमोल पाटील, खालापूर
मुले ही देवाघरची फुले आहेत, असे बोलले जाते. समाजातील सर्वच घटकांतील मुलांनी शिक्षणापासून वंचित न राहता शिक्षणाच्या प्रवाहात येवून स्वत:सोबत राष्ट्राच्या प्रगतीतील एक हिस्सा बनले पाहिजे, अशी अपेक्षा सर्वचजण व्यक्त करतात, मात्र खोपोलीमधील तीन भावंडे शिक्षणासाठी अंगमेहनतीची कामे करून शिक्षण घेत असल्याने समाजापुढे या मुलांनी वेगळाच आदर्श ठेवला आहे. घर चालवण्यासाठी आणि शिक्षण पूर्ण होण्यासाठी ही भावंडे सफाईची कामे करीत आहेत.
खोपोली शहर हे गेल्या काही वर्षात झपाट्याने विकास पावले आहे. अनेकजण रोजगारासाठी शहरात ये- जा करतात. ही परिस्थिती एकीकडे तर शहराच्या वर्धमान नगरात राहणाऱ्या पुष्पा शेडगे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. वडिलांचे छत्र हरपल्याने उघड्यावर आलेल्या या कुटुंबाला सावरण्यासाठी कसलीच तरतूद या कुटुंबापुढे नसल्याने स्वत: कमवून घर आणि शिक्षण चालवण्याकरिता सारेच परिस्थितीशी झगडत आहेत. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि बेताची असल्याने स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वेगळीच वाट निवडली आहे. मुले छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असून मोठा मुलगा दत्ता आणि पांडुरंग हे दोघे नववीत तर मुलगी सुमन ही सातवीत शिक्षण घेत आहे.