सायनमध्ये प्रियकराच्या मदतीने बहिणीनेच काढला भावाचा काटा

By Admin | Updated: November 16, 2014 01:48 IST2014-11-16T01:48:31+5:302014-11-16T01:48:31+5:30

सायन किल्ल्यामध्ये डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केलेल्या 23वर्षीय होमगार्ड तरुणाच्या हत्येचे गूढ उकलण्यास सायन पोलिसांना यश आले.

Sion's sister took out with the help of a boy | सायनमध्ये प्रियकराच्या मदतीने बहिणीनेच काढला भावाचा काटा

सायनमध्ये प्रियकराच्या मदतीने बहिणीनेच काढला भावाचा काटा

मुंबई :  सायन किल्ल्यामध्ये डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केलेल्या 23वर्षीय होमगार्ड तरुणाच्या हत्येचे गूढ उकलण्यास सायन पोलिसांना यश आले. प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून 19वर्षीय बहिणीने प्रियकराच्या मदतीने भावाचाच काटा काढल्याचे वास्तव तपासातून पुढे आले आहे. 
या प्रकरणी सायन पोलिसांनी आरोपी बहीण सुमन विश्वकर्मा हिच्यासह प्रियकर दीपक शिवप्रसाद कोरी (24) याला अटक केली आहे. सोनू विश्वकर्मा, असे मृत तरुणाचे नाव असून तो आई-वडील आणि बहीण सुमनसह धारावीच्या नाईक नगरात राहत होता. 4 नोव्हेंबरला सायन किल्ल्याजवळील झाडीमध्ये डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळताच गुन्हे शाखेच्या अधिका:यांसह सायन पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. 
मुळात सोनू आणि दीपक बालपणीचे मित्र. मैत्रीत सोनूच्या घरी ये-जा असलेल्या दीपकचे सुमनसोबत सूत जुळले आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र काही दिवसांपूर्वीच या संबंधांबाबत सोनूला माहिती मिळाली. सोनूचा या संबंधांना विरोध होता. सुमनला न भेटण्याबाबत सोनूने दीपकला बजावले होते. तसेच सुमनलाही त्याने ताकीद दिली होती. सोनूच्या तंबीनंतर काही दिवस वेगळे राहिलेल्या दीपक व सुमन यांच्यात पुन्हा भेटी सुरू झाल्या. ही बाब कानी येताच सोनू भडकला. त्याने सुमनला रागाच्या भरात बदडले. त्याचा बदला घेण्यासाठी व प्रेमसंबंधांमधील अडसर दूर करण्यासाठी दोघांनी सोनूच्या हत्येचा कट रचला. ठरल्याप्रमाणो ताडी पिण्यासाठी गळ घालून दीपकने दुपारी दीडच्या सुमारास सोनूला ताडी दुकानावर नेले. तेथे त्याला ताडी पाजून फिरायला जाण्याच्या बहाण्याने सायन किल्ल्याच्या मागील झाडीत नेले. तेव्हा सुमनही त्याच्यासोबत होती. दुपारी 3च्या सुमारास कोणी येत आहे का, यावर सुमनला लक्ष ठेवण्यास सांगून चार वेळा डोक्यात दगड घालून सोनूची हत्या केल्याची कबुली दीपकने पोलिसांना दिली आहे. (प्रतिनिधी)
 
गायकवाड यांच्यासह हवालदार प्रमोद गावित, शिपाई धनराज पाटील, रोहन खैरनार, शशिकांत माळी, नारायण गाडेकर आणि दीपक हिरे यांच्या पथकाला मृतदेह सोनूचा असल्याची माहिती मिळाली. सोनूच्या मोबाइलचा तपशील काढून या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. त्यात घटनेच्या दिवशी अखेरचा कॉल दीपकचा होता. त्यात दीपकशी असलेली मैत्री आणि त्याची बहीण सुमन हिच्या प्रेमसंबंधाची माहिती पोलिसांना मिळाली. सोनूचा चोरलेला मोबाइल दीपककडे सापडताच पोलीस पथकाने तो काम करीत असलेल्या बॅग बनविण्याच्या कारखान्यात सापळा रचून त्याला अटक केली. 

 

Web Title: Sion's sister took out with the help of a boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.