Join us

गायक मिका सिंगच्या घरात चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 09:32 IST

चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने आणि एक लाखाची रोख रक्कम लंपास केली आहे.

मुंबई - प्रसिद्ध गायक मिका सिंगच्या मुंबईतील घरामध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने आणि एक लाखाची रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी मिका सिंगच्या मॅनेजरने ओशिवरा पोलिसात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.  

रविवारी (30 जुलै) दुपारी ही चोरीची घटना घडली. मिका सिंगचा एक सहकारी त्यावेळी घरात उपस्थित होता. त्याचदरम्यान चोरी झाली असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिका सिंगच्या जवळच्या सहकाऱ्याविरोधात चोरीची तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते. मात्र पोलिसांनी संशयित व्यक्तिचे नाव सांगितले नाही. 

मिका सिंग राहत असलेल्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यामध्ये संशयित व्यक्ती मिकाच्या घरात जाताना आणि बाहेर येताना दिसत आहे. ही व्यक्ती गेल्या 14 वर्षापासून त्याच्यासोबत काम करत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :मिका सिंगमुंबई