‘सिंगापुरी’ कासवाची सुटका

By Admin | Updated: August 14, 2014 01:25 IST2014-08-14T01:25:31+5:302014-08-14T01:25:31+5:30

पूर्व उपनगरांतील भांडुपमधील ‘पॉज’ या प्राणिमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात आढळून आलेल्या सिंगापुरी कासवाची सुखरूप सुटका केली आहे.

'Singaporean' Tasavi's Releases | ‘सिंगापुरी’ कासवाची सुटका

‘सिंगापुरी’ कासवाची सुटका

मुंबई : पूर्व उपनगरांतील भांडुपमधील ‘पॉज’ या प्राणिमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात आढळून आलेल्या सिंगापुरी कासवाची सुखरूप सुटका केली आहे.
ऐन पावसाळ्यात हिरव्यागार ठिकाणी अथवा वस्त्यांच्या कानाकोपऱ्यात कासवे आढळून येत आहेत. मागील दोन आठवड्यांत ‘पॉज’ला अशाच प्रकारे स्थानिक परिसरात दोन कासवे आढळून आली होती. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पवई तलावात सोडून दिले. शिवाय त्यानंतर स्थानिक परिसरातील रूपेश थोपटे यांना ‘सिंगापुरी’ कासव आढळून आले होते, तशी माहिती त्यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांना दिली. यावर कार्यकर्त्यांनी त्या कासवाला ताब्यात घेतले. शिवाय त्याला काही जखमा झाल्याने त्याच्यावर उपचारही केले. त्यानंतर उपचार करून ‘सिंगापुरी’ कासवाला येथील एका कृत्रिम तलावात सोडून दिल्याचे संस्थेने सांगितले. मागील आठवड्यात पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड-ऐरोली जंक्शनलगत कार्यकर्त्यांना एक कासव मृत अवस्थेत आढळले होते. दरम्यान, कासव छोटे असताना त्याला टँकमध्ये पाळण्यात येते. मात्र ते मोठे झाल्यानंतर घराबाहेर कुठेही सोडण्यात येते. परिणामी एक तर त्यांचा मृत्यू होतो किंवा ते भरकटते, असे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Singaporean' Tasavi's Releases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.