Join us

मध्य रेल्वेवर सिग्नल यंत्रणेत बिघाड; लोकल खोळंबल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 09:30 IST

मुंबईच्या दिशेने जाताना मुंब्रा बोगद्याआधी एक जलद लोकल 20 मिनिटांपासून उभी होती.

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत समस्या, दिवा मुंब्रा जलद मार्ग प्रभावित झाला आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्या असून उकाड्यामुळे प्रवासी हैरान झाले आहेत. 

मुंबईच्या दिशेने जाताना मुंब्रा बोगद्याआधी एक जलद लोकल 20 मिनिटांपासून उभी होती. गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमध्ये नेमके काय झाले प्रवाशाना समजत नव्हते. प्रचंड उकाडा झाल्याने प्रवासी हैराण झाले होते, अशी माहिती बदलापूरचे रहिवासी संजय मेस्त्री यांनी दिली.

 मेस्त्री ज्या लोकलमधून प्रवास करत होते त्या लोकल समोर सिग्नल बिघाड झाला होता.  त्यामुळे पाठोपाठ जाणाऱ्या 5 लोकल दिवा मार्गावर खोळंबल्या आहेत. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कामावर जाण्यासाठी सुमारे अर्धा अधिक तास विलंब होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :लोकलमध्य रेल्वे