Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाने ट्विटरवर केलेल्या तक्रारीनंतर तासाभरात ग्रँट रोड येथील सिग्नल दुरुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 03:49 IST

मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे, पण पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावर सिग्नलमध्ये बिघाड झाला होता. त्याबाबतचा व्हिडीओ एका प्रवाशाने ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर तासाभरात पोलिसांनी त्याची दुरुस्ती केली.

मुंबई : मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे, पण पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावर सिग्नलमध्ये बिघाड झाला होता. त्याबाबतचा व्हिडीओ एका प्रवाशाने ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर तासाभरात पोलिसांनी त्याची दुरुस्ती केली.मुंबईकर पावसाळ्यात होणाऱ्या समस्यांबाबत ट्विटच्या माध्यमातून वाचा फोडत आहेत. ग्रँट रोड येथील नानाचौकातील सिग्नल नादुरुस्त झाला होता. त्याचा व्हिडीओ तुषार वारंग याने ट्विटरवर पोस्ट केला, तसेच ग्रँट रोडमधील नाना चौकातील सिग्नल नादुरुस्त झाला आहे, त्याचा पादचाऱ्यांना त्रास होत असून, तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी केली, तसेच त्या पोस्टमध्ये मुंबई महापालिका, मुंबई पोलीस यांना टॅग केले. त्यावर पालिकेने उत्तर देत, सिग्नल नादुरुस्त असल्याचे लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे. हा परिसर डी प्रभागाच्या अंतर्गत येत असून, तुमची विनंती त्यांना याबाबत कळविण्यात आले आहे. यासोबतच मुंबई पोलिसांची त्यावर उत्तर दिले असून, ही बाब लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, याची माहिती आम्ही वाहतूक विभागाला कळविली आहे, असे म्हटले. या पोस्टची दखल घेत, तासाभरात सिग्नलची दुरुस्ती केली, तसेच दुरुस्त सिग्नलचा फोटो ट्विट करून याची माहिती दिली. पोलिसांच्या या तत्काळ कारवाईबद्दल तुषार वारंगने पोलिसांचे कौतुक केले आहे.

टॅग्स :मुंबई