Join us

सिग्नल बिघडले; पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेला फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 09:41 IST

पश्चिम रेल्वे मार्गावर मंगळवारी सायंकाळी झालेल्या सिग्नल बिघाडाचा फटका लोकलच्या वेळापत्रकावर झाला.

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर मंगळवारी सायंकाळी झालेल्या सिग्नल बिघाडाचा फटका लोकलच्या वेळापत्रकावर झाला. सिग्नल बिघाडामुळे लोकलला लेटमार्क लागल्याने बहुतांशी रेल्वे स्थानकांवर गर्दी झाली होती. 

सायंकाळी ४:३५च्या सुमारास वसई आणि विरार स्थानकांदरम्यान सिग्नल बिघाड झाला होता. परिणामी, जलद आणि धिम्या मार्गावरील गाड्या विलंबाने धावत होत्या. याचा फटका प्रामुख्याने वसई आणि विरार स्थानकांदरम्यानच्या सेवेवर झाला. उशिरापर्यंत सिग्नलमधील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, पश्चिम रेल्वे चर्चगेट आणि डहाणू स्थानकांदरम्यान रोज १ हजार ४०० उपनगरीय सेवा चालविते. यातून सुमारे ३० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वे