साईडपट्ट्यांच्या डांबरीकरणाची मागणी

By Admin | Updated: November 30, 2014 22:35 IST2014-11-30T22:35:37+5:302014-11-30T22:35:37+5:30

पावसाळा संपताच सार्वजनिक खात्याचे खड्डे बुजविण्याचे काम मुरुड-आगरदांडा-शिघ्रे या रस्त्यावर सुरु झाले, मात्र तेलवडेपासून आगरदांडा या रस्त्याच्या दुतर्फा उखडलेल्या साईडपट्ट्या भराव करुन डांबरीकरण

Sidebar Stamping Requirement | साईडपट्ट्यांच्या डांबरीकरणाची मागणी

साईडपट्ट्यांच्या डांबरीकरणाची मागणी

मुरुड : पावसाळा संपताच सार्वजनिक खात्याचे खड्डे बुजविण्याचे काम मुरुड-आगरदांडा-शिघ्रे या रस्त्यावर सुरु झाले, मात्र तेलवडेपासून आगरदांडा या रस्त्याच्या दुतर्फा उखडलेल्या साईडपट्ट्या भराव करुन डांबरीकरण देखील हाती घेणे अत्यंत गरजेचे आहे.
या रस्त्यावरील वाढती वर्दळ आणि दुचाकी वाहनांची संख्या लक्षात घेता वाहनचालकांची भंबेरी उडते. समोरुन मोठे वाहन आल्यानंतर साईडपट्ट्या उखडल्यामुळे रस्त्याखाली उतरणे अपघाताला निमंत्रण आहे. अधूनमधून किरकोळ अपघाताच्या घटना होत असतात.
जीवितास धोका असल्याने तेलवडे ते आगरदांडा रस्त्यावरील साईडपट्ट्या भराव करुन त्या युद्धपातळीवर डांबरीकरण करण्याची मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थ करीत आहेत. पंडित पाटील हे काम पूर्ण करण्याकामी लक्ष घालतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Sidebar Stamping Requirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.