मुंबई: प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायकाच्या चरणी भाविकांनी गेल्या वर्षभरात सुमारे १८२ कोटी रुपये अर्पण केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सिद्धिविनायक न्यासाच्या उत्पन्नात ३५ टक्के वाढ झाली आहे.
न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या शनिवारी पार पडली. या बैठकीत सन २०२५-२०२६ चे वार्षिक विवरणपत्र तसेच सन २०२६-२०२७चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले. कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी हा अहवाल मांडला. न्यासाने गेल्या आर्थिक वर्षात १५५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले होते. मात्र, भाविकांची गर्दी वाढत असून ते मोठ्या श्रद्धेने यथाशक्ती दान बाप्पाच्या चरणी अर्पण करीत आहेत. अभिषेक, पूजा व अन्य माध्यमातूनही न्यासाच्या उत्पन्नात भर पडत आहे.
'श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'
अर्थसंकल्पात सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबविण्याचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांत ८ मार्च जागतिक महिलादिनी जन्मलेल्या नवजात बालिकांच्या नावाने १० हजार रुपयांची मुदत ठेव त्यांच्या मातांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.
'लेक वाचवा, लेकीला शिकवा' योजनेला हातभार
मुर्लीच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार देणे आणि सक्षमीकरणाला चालना देणे हा श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील 'लेक वाचवा, लेकीला शिकवा' या उपक्रमाला हातभार लावण्याचा न्यासाचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Web Summary : Mumbai's Siddhivinayak temple received ₹182 crore in donations, marking a 35% increase in trust income. The trust will support initiatives like depositing ₹10,000 for newborn girls in government hospitals and contributing to the 'Save Girl Child, Educate Girl Child' campaign.
Web Summary : मुंबई के सिद्धिविनायक मंदिर को ₹182 करोड़ का दान मिला, जिससे ट्रस्ट की आय में 35% की वृद्धि हुई। ट्रस्ट सरकारी अस्पतालों में नवजात लड़कियों के लिए ₹10,000 जमा करने और 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' अभियान में योगदान करने जैसी पहलों का समर्थन करेगा।