मुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ भाटीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:07 IST2021-02-10T04:07:07+5:302021-02-10T04:07:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : द मुंबई प्रेस कल्बच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ भाटीया हे ...

Siddharth Bhatia as the President of Mumbai Press Club | मुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ भाटीया

मुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ भाटीया

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : द मुंबई प्रेस कल्बच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ भाटीया हे विजयी झाले आहेत. कार्यकारिणी मंडळासाठी झालेल्य़ा या निवडणुकीत पीडीए पॅनेलने १६ पैकी १६ जागांवर विजय मिळवला.

द मुंबई प्रेस क्लबच्या द्विवार्षिक कार्यकारिणी मंडळासाठी चेअरमनपदी गुरबीर सिंग तर कोषाध्यक्ष पदासाठी छायाचित्रकार रजनीश काकडे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. प्रत्यक्ष निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी समर खडस यांनी विजय मिळविला. तर सचिवपदी राजेश मस्करान्हस निवडून आले. तर सहसचिवपदी छायाचित्रकार आशिष राजे निवडून आले. तर, मयुरेश गणपत्ये, रश्मी पुराणिक, प्रवीण काजरोळकर, समीर शानबाग, सतीश माळवदे, गार्डन डिस्कोटा, किरण उमीग्रर, सौरभ शर्मा, इंद्रजित गुप्ता यांची कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड झाली.

Web Title: Siddharth Bhatia as the President of Mumbai Press Club