मॉलमध्ये शुकशुकाट, काही दुकानेही बंद

By Admin | Updated: November 10, 2016 04:03 IST2016-11-10T04:03:40+5:302016-11-10T04:03:40+5:30

जवळ पैसा असून देखील तो खर्च करु शकत नाही, अशीच काहीशी परिस्थिती मुंबईकरांची झाल्याचे चित्र आज ठिकठिकाणी दिसून आले

Shukushkat in the mall, some shops closed | मॉलमध्ये शुकशुकाट, काही दुकानेही बंद

मॉलमध्ये शुकशुकाट, काही दुकानेही बंद

मुंबई : जवळ पैसा असून देखील तो खर्च करु शकत नाही, अशीच काहीशी परिस्थिती मुंबईकरांची झाल्याचे चित्र आज ठिकठिकाणी दिसून आले. ग्राहक नसल्याचा फटका मॉलमधील दुकानदारांना देखील मोठ्या प्रमाणात बसला. मॉलमध्ये कोणीच फिरकत नसल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला. तर दिवसभर दुकानांमध्ये ग्राहकच न आल्याने अनेक दुकानदारांनी दुपारनंतर दुकाने बंद ठेवणेच पसंत केले.
चेंबूरमधील सायन-ट्रॉम्बे रोडवरील के स्टार मॉलमध्ये नेहमीच नागरिकांची मोठी गर्दी असते. चेंबूरमधील हा एकमेव मॉल असल्याने तरुण-तरुणीं देखील नेहमीच येथे दिसून येतात. मात्र मंगळवार मध्यरात्रीपासून बंद झालेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटांमुळे या मॉलमध्ये बुधवारी शुकशुकाट दिसून आला. (प्रतिनिधी) फेरीवाल्यांवर मोठे संकट
चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांकडे स्वस्त आणि चांगले कपडे मिळत असल्याने मानखुर्द, कुर्ला, घाटकोपर, गोवंडी, वडाळा आणि सायन येथून नागरिक खरेदीसाठी येतात. मात्र केंद्र सरकारच्या ५००, १०००च्या नोटा बंदीमुळे आज चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. सकाळी फेरीवाल्यांनी दुकाने थाटली होती. रोज २ ते ३ हजारांचा व्यवसाय करणाऱ्या या फेरीवाल्यांना आज २०० ते ३०० रुपये देखील मिळाले नाहीत. दिवसभर ग्राहकांची वाट हे फेरीवाले पाहत होते. सरकारचा निर्णय योग्य असला तरी आमच्यावर मात्र आज उपासमारीची वेळ आल्याने घरी काय घेऊन जायचे? असा सवाल समशेर शेख या फेरीवाल्याने उपस्थित केला.

Web Title: Shukushkat in the mall, some shops closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.