Join us
Daily Top 2Weekly Top 5

शुभंकरोती परिवाराचे राज्यस्तरीय संमेलन उत्साहात; अभिनेत्री सोनालिका जोशींचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 21:52 IST

शुभंकरोति साहित्य परिवार आणि नॅशनल लायब्ररी वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार वांद्रे पश्चिम येथे राज्यस्तरीय समर्थ नारी सन्मान पुरस्कार वितरण आणि कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते

मुंबई - समर्थ नारी सन्मान आणि मान्यवरांचे कविसंमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांनी शुभंकरोती साहित्य परिवाराचे मुंबईतील पहिले राज्यस्तरीय संमेलन मोठ्या उत्साहात शनिवारी वांद्रे येथे संपन्न झाले. यावेळी अभिनेत्री सोनालिका जोशी यांना 'समर्थ नारी सन्मान' देऊन गौरव करण्यात आला.  

शुभंकरोति साहित्य परिवार आणि नॅशनल लायब्ररी वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार वांद्रे पश्चिम येथे राज्यस्तरीय समर्थ नारी सन्मान पुरस्कार वितरण आणि कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक, कवी चंद्रकांत वानखेडे,  कवयित्री हेमांगी नेरकर, नॅशनल लायब्ररीचे कार्यवाहक प्रमोद महाडिक, शुभंकरोतीच्या संस्थापिका सोनाली जगताप, डॉ.माया यावलकर यांच्या उपस्थितीत झाले. 

अभिनेत्री सोनालिका जोशी यांचा गौरव यावेळी विशेष पाहुण्या म्हणून तारक मेहता का उल्टा चश्मा या सुप्रसिद्ध टीव्ही मालिकेतील मिसेस भिडे. म्हणजे अभिनेत्री सोनालिका जोशी आणि त्याच्या मातोश्री प्रतिभा कुलकर्णी या मायलेकीचा 'समर्थ नारी सन्मान' देऊन गौरव करण्यात आला. 

या संमेलनाचे सूत्रसंचालन स्वाती पोळ आणि शिल्पा च-हाटे यांनी केले. ऋचा पारेख आणि ईशस्तवन गायले. त्यानंतर समृध्दी अनिल पवार या उभयतांचा सन्मान करण्यात आला. तसेच शुभंकरोती समर्थ नारी सन्मान पुरस्कार देऊन दुर्वा मुरुडकर,जयश्री चौधरी,मानसी पंडित, जागृती पुरोहित,अनिता घायवट, सरोज बारोट, मनीषा मुरुडकर, रोहिणी जाधव, शिल्पा च-हाटे,लक्ष्मी रेड्डी, स्वाती पोळ,ऋतुजा कुळकर्णी  आदी महिलांना गौरविण्यात आले.

टॅग्स :मुंबई