Join us  

शिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका, केली मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 12:59 PM

Shripad Chhindam : २०१८ मध्ये अहमदनगरच्या उपमहापौरपदावर असताना  श्रीपाद छिंदमन याने फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारले होते.

मुंबई - छत्रपती शिववाजी महाराजांविषयी अपशब्द  काढणाऱ्या श्रीपाद छिंदम याला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने दणका दिला आहे. महापुरुषांबद्दल अपशब्द काढल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

२०१८ मध्ये अहमदनगरच्या उपमहापौरपदावर असताना  श्रीपाद छिंदमन याने फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर छिंदमविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. जनक्षोभ पाहून छिंदमकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेण्यात आला होता. तसेच त्याची भाजपामधूनही हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे नगरसेवकपदही रद्द करण्याचा ठराव अहमदनगरच्या महानगरपालिकेत पारीत करण्यात आला होता.

दरम्यान, छिंदम याने २०१८ मध्ये झालेली अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यावेळी  निवडणूक काळात प्रशासनाने छिंदमला शहरातून हद्दपार केले होते. मात्र असे असूनही श्रीपाद छिंदम अहमनगर महानगरपालिकेच्या प्रभाग 9 (क) मूधन सर्वसाधारण जागेवर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आला होता.

संबंधित बातम्या 

शिवरायांबद्दल अनुद्गार काढणाऱ्या छिंदमला मतदारांचा हिसका, डिपॉझिटही जप्त

शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमसह 70 जणांना शहरबंदी

महापुरुषांच्या आशीर्वादानेच मी विजयी, श्रीपाद छिंदम छत्रपतींसमोर नतमस्तक 

त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्याने नशीब आजमावले होते. अहमदनगर शहर या मतदारमधून बहुजन समाजवादी पक्षाच्या तिकीटावर छिंदमने निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत छिंदमचा दारूण पराभव झाला होता.

अखेरीस आज राज्य सरकारने महापुरुषांबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या आरोपाखाली त्याचे नगरसेवकपद रद्द करण्याची कारवाई केली आहे.

टॅग्स :श्रीपाद छिंदमछत्रपती शिवाजी महाराजमहाराष्ट्र सरकारअहमदनगर