वसईत वटपौर्णिमेसाठी बाजारपेठांमध्ये झुंबड

By Admin | Updated: June 12, 2014 01:59 IST2014-06-12T01:59:02+5:302014-06-12T01:59:02+5:30

वटपौर्णिमेसाठी वसईत बुधवारी वाजारपेठा सजल्या होत्या. वसई झेंडाबाजार मंडईत विविध प्रकाराच्या खरेदीसाठी महिलावर्गाने गर्दी केली होती.

Shrimp in the market for Vasaiat Wat Pournima | वसईत वटपौर्णिमेसाठी बाजारपेठांमध्ये झुंबड

वसईत वटपौर्णिमेसाठी बाजारपेठांमध्ये झुंबड

नायगाव : वटपौर्णिमेसाठी वसईत बुधवारी वाजारपेठा सजल्या होत्या. वसई झेंडाबाजार मंडईत विविध प्रकाराच्या खरेदीसाठी महिलावर्गाने गर्दी केली होती. फळांसह पूजेसाठी लागणारे साहित्य, वडाच्या फांद्या, फणस, जांभळे, आंबे आदींचे विक्रेते मोठया प्रमाणात जमा झाले होते.
मागील काही वर्षात या सणाचे स्वरूप बदलू लागले आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वरूप नष्ट होऊन स्वतंत्रपणे वटपौर्णिमा करणारे अनेक जण आहेत. बुधवारी सकाळपासुनच शहरी, ग्रामीण भागातील नागरिकांची खरेदीसाठी रिघ लागली होती. ओटीच्या सामानासह, अत्तर, अगरबत्त्यांचे व्यापारी आज आपली दुकाने मोठया थाटात सजवून बसले होते. फुलांचीही मागणी वाढल्याने फुलबाजारात चढया भावाने फुले विकली जात होती. (वार्ताहर)

Web Title: Shrimp in the market for Vasaiat Wat Pournima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.