Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांत देशपांडे सामान्य प्रशासन विभागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 08:26 IST

ही बदली जाहीर करतानाच देशपांडे यांच्यावर नवी कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आली नव्हती. 

मुंबई : निवडणूक तोंडावर राज्याचे माजी राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. ही बदली जाहीर करतानाच देशपांडे यांच्यावर नवी कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आली नव्हती. 

श्रीकांत देशपांडे यांची बुधवारी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एटापल्लीच्या आयटीडीपीचे प्रकल्प संचालक आदित्य जयवाने यांची बदली अहेरी येथील सहायक जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे.

टॅग्स :श्रीकांत देशपांडे