मालाड येथील श्री. एम. डी. शाह महिला महाविद्यालयात 'आधुनिक तंत्रज्ञान सप्ताह' साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:06 AM2021-05-17T04:06:27+5:302021-05-17T04:06:27+5:30

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा शर्मा यांनी केले. विभागप्रमुख डॉ. प्रीती जैन यांच्या संकल्पनेतून हा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ...

Shri. M. D. 'Modern Technology Week' celebrated at Shah Women's College | मालाड येथील श्री. एम. डी. शाह महिला महाविद्यालयात 'आधुनिक तंत्रज्ञान सप्ताह' साजरा

मालाड येथील श्री. एम. डी. शाह महिला महाविद्यालयात 'आधुनिक तंत्रज्ञान सप्ताह' साजरा

Next

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा शर्मा यांनी केले. विभागप्रमुख डॉ. प्रीती जैन यांच्या संकल्पनेतून हा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रम साकारला गेला.

प्रा. मानसी घुले आणि सारिका गावडे यांनी विद्यार्थिनींच्या मदतीने कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले.

एकूण १३२ स्पर्धक आणि १००० पेक्षा अधिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा झूम आणि यूट्यूबच्या माध्यमातून आस्वाद घेतला. नियोजनापासून सादरीकरणापर्यंत संपूर्ण कार्यक्रमाची धुरा विद्यार्थिनींनी स्वयंस्फूर्तीने अतिशय समर्थपणे सांभाळली.

पहिल्याच दिवशी ‘टेक चॅम्प्स’ या स्पर्धेत विद्यार्थिनींनी खूप उत्साहाने आपल्या ज्ञानाचा उपयोग करून बनविलेले नावीन्यपूर्ण संगणकीय खेळ या स्पर्धेत बघायला मिळाले.

दुसऱ्या दिवशी 'टेक अ अ‌ॅनिमेशन' ही अतिशय उद्बोधक स्पर्धा होती, या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अ‌ॅनिमेटेड क्लिप्सद्वारे टेक्नॉलॉजी ही संकल्पना खूपच सर्जनशीलतेने समजावली.

तिसऱ्या दिवशी झालेल्या 'टेक क्विझ'ला भरभरून प्रतिसाद मिळाला. याच दिवशी 'टेक डिबगिंग'मध्ये तर स्पर्धकांच्या तांत्रिक ज्ञानाचा कस लागला. शेवटच्या दिवशी 'टेक क्लिक'मध्ये 'टेक्नॉलॉजी' या विषयावर आधारित छायाचित्रण कौशल्याच्या स्पर्धेत महाविद्यालयातील इयत्ता ११ वीपासून पदवीपर्यंतच्या विविध विभागातील विद्यार्थिनींनी भाग घेऊन खूपच रंगत आणली.

-----------------------------------------------------

Web Title: Shri. M. D. 'Modern Technology Week' celebrated at Shah Women's College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.