श्रेयासाठी सेना-काँग्रेसमध्ये जुंपली

By Admin | Updated: December 4, 2014 01:25 IST2014-12-04T01:25:24+5:302014-12-04T01:25:24+5:30

प्रत्येक प्रकल्पाचे श्रेय लाटणाऱ्या शिवसेनेला काँग्रेसने शह दिल्यानंतर संबंधित नगरसेवकांवर कारवाईसाठी आयुक्तांवर दबाव

For the Shreya, the army-Congress got involved | श्रेयासाठी सेना-काँग्रेसमध्ये जुंपली

श्रेयासाठी सेना-काँग्रेसमध्ये जुंपली

मुंबई : प्रत्येक प्रकल्पाचे श्रेय लाटणाऱ्या शिवसेनेला काँग्रेसने शह दिल्यानंतर संबंधित नगरसेवकांवर कारवाईसाठी आयुक्तांवर दबाव आणण्याचे मनसुबे आखणाऱ्या सेना नेत्यांचा काँग्रेसने चांगलाच समाचार घेतला आहे़ हिंमत
असेल तर कारवाई करून दाखवा, असे थेट आव्हानच
विरोधी पक्षनेत्यांनी दिल्यामुळे हा वाद पेटण्याची
चिन्हे आहेत़
माटुंगा फाइव्ह गार्डनच्या लोकार्पण सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका नयना सेठ यांनी आव्हान दिले होते़ पक्षप्रमुखांचा असा अपमान झाल्यामुळे सेठ यांना अद्दल घडविण्यासाठी त्यांच्यावर कारवाईची मागणी शिवसैनिकांमधून होऊ लागली़ विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी वांद्रे तलावाचे सुशोभीकरण सुरू करून शिवसेनेला असेच आव्हान दिले आहे़
त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे करण्याची तयारी शिवसेना नेत्यांनी केली होती़ मात्र काँग्रेसने यावर आपली तिखट प्रतिक्रिया देत शिवसेनेने कारवाई करून दाखवावीच, असे आव्हान दिले आहे़ संबंधित दोन्ही प्रकल्पांत काँग्रेसच्या नगरसेवकांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता़ दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याची शिवसेनेची जुनी खोड असल्याचा टोला आंबेरकर यांनी लगावला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: For the Shreya, the army-Congress got involved