Join us
Daily Top 2Weekly Top 5

पतीला व्हिडीओ दाखवितो, म्हणत विवाहितेकडून १७ लाख उकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 13:51 IST

शिवाजी नगर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवत अक्षय सिंगला (२३) अटक केली असून त्याच्या दोन मावशींचाही पोलिस शोध घेत आहेत.

मुंबई :

ओळखीचे रूपांतर प्रेमात होताच दोघेही अनैतिक संबंधात अडकले. याच संबंधाची माहिती आणि खासगी व्हिडीओ पतीला दाखविण्याची भीती दाखवून प्रियकराने महिलेकडून १७ लाख उकळले. महिलेने पैसे देणे बंद करताच तिला एका खोलीत कोंडून लाकडी दांडक्यासह पट्ट्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिवाजी नगरमध्ये घडली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवत अक्षय सिंगला (२३) अटक केली असून त्याच्या दोन मावशींचाही पोलिस शोध घेत आहेत.

गोवंडी परिसरात राहणाऱ्या महिलेची २०२१ मध्ये अक्षयसोबत ओळख झाली होती. कालांतराने ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या काही दिवसांत आरोपीकडून पैशांची मागणी वाढली. प्रेयसीने संवाद कमी केल्यानंतर दोघांचे खासगी व्हिडिओ पतीला दाखविण्याच्या बहाण्याने पैसे काढण्यास सुरुवात केली. १ डिसेंबर २०२१ ते ३ डिसेंबर २०२३ दरम्यान तक्रारदार यांच्याकडून १२ लाख रुपयांची रोकड तसेच त्यांचे २० तोळे सोने गहाण ठेवून पाच लाख घेतले हाेते.

 पैसे देणे बंद केल्यामुळे ३० नोव्हेंबर रोजी रात्री दीड ते पहाटे साडे चार वाजेपर्यंत  महिलेला अक्षय आणि त्याची मावशी सुनीताने त्यांच्या शिवाजीनगर येथील घरात कोंडले. तेथे महिलेला लाकडी दांडक्याने, बेल्टने मारहाण करून दुखापत केली. सुनीतानेही लाथाबुक्यांनी मारहाण केली.

महिलेला बसला मानसिक धक्कातेथून सुटका झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास अक्षयची दुसरी मावशी लक्ष्मी हिने महिलेला पुन्हा बोलावून घेत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अक्षयकडून दहा हजार रुपये घेतल्याचे बोलण्यास सांगून व्हिडीओ तयार केला. अखेर, अत्याचाराने परिसीमा गाठल्याने महिलेने तक्रार केली असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेने महिलेला मानसिक धक्का बसला आहे.

टॅग्स :मुंबई