नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहिर
By Admin | Updated: May 13, 2015 00:29 IST2015-05-13T00:29:37+5:302015-05-13T00:29:37+5:30
१० मे रोजी नगराध्यक्षपदाची मुदत संपलेली असतांनाही निवडणूकीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर जिल्हाधिका-यांनी अंबरनाथ

नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहिर
अंबरनाथ : १० मे रोजी नगराध्यक्षपदाची मुदत संपलेली असतांनाही निवडणूकीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर जिल्हाधिका-यांनी अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहिर केली आहे. १८ मे रोजी दोन्ही पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
अंबरनाथमध्ये ५७ जागांसाठी आणि बदलापूरात ४७ जागांसाठी २२ मे रोजी निवडणूक घेण्यात आली होती. ही निवडणूक झाल्यावर १० मेच्या आत नगराध्यक्षपदाची निवडणूक होणे गरजेचे होते. मात्र नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयालाच संभ्रम निर्माण झाल्याने या आरक्षणाची माहीती घेण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला.
शासनाने आरक्षणाबाबत निर्णय दिल्यावर लागलीच जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी दोन्ही
पालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहिर केली आहे. १८ मेला एकाच दिवशी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूका घेण्यात येणार आहे. या पदासाठी
१३ मे रोजी अर्ज दाखल करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. तर माघारीसाठी १६ मे ही तारीख
निश्चित करण्यात आली आहे. एकपेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज आले तरच निवडणूकीची प्रक्रिया पार पडणार आहे.