मीरारोडमधील हितांशी नर्सिंग होमला पालिकेची करणे दाखवा नोटीस
By Admin | Updated: November 10, 2016 17:17 IST2016-11-10T17:17:32+5:302016-11-10T17:17:32+5:30
मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीत असलेले हितांशी नर्सिंग होम हे मीरारोडमधील पूनम विहार गृहसंकुलात त्यातील काही रहिवाशांच्याच ना हरकत दाखल्यासह पालिकेच्या आवश्यक

मीरारोडमधील हितांशी नर्सिंग होमला पालिकेची करणे दाखवा नोटीस
>ऑनलाइन लोकमत/ राजू काळे
भाईंदर, दि. 10 - मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीत असलेले हितांशी नर्सिंग होम हे मीरारोडमधील पूनम विहार गृहसंकुलात त्यातील काही रहिवाशांच्याच ना हरकत दाखल्यासह पालिकेच्या आवश्यक परवानगीमुळे गेल्या सहा वर्षांपासून सुरु आहे. या नर्सिंग होमेचे प्रवेशद्वार रहिवाशांच्या वहिवाटीच्या रस्त्यातूनच असल्याने गेल्या काही महिन्यांपासून येथील रहिवाशांनी त्या नर्सिंग होमला तेथून हटविण्यासाठी आंदोलन सुरु केले. यावर आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यापुढे झालेल्या सुनावणीनंतर पालिकेने रहिवासी क्षेत्रात बदल करण्यास अनुमती दिलेला ना हरकत दाखला रद्द करण्यात आला. तसेच त्याचा परवाना रद्द करण्यासाठी वैद्यकीय विभागाने मालक डॉ. रामकुमार शर्मा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पालिकेच्या या अनपेक्षित कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले आहे. वैद्यकीय कायद्यात रुग्णालय कुठे सुरु करावे, अशी अट कुठेही नमूद केलेली नसताना पालिकेच्या इतिहासात अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच होत आहे. अशा प्रकारची कारवाई होत राहिल्यास शहरातील बहुतांशी रुग्णालये व दवाखाने बंद होतील, अशी भीती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मीरा-भाईंदर शाखेचे अध्यक्ष डॉ. राजीव अग्रवाल यांनी व्यक्त केली. याबाबत नर्सिंग होमचे मुख्य डॉ. रामकुमार शर्मा यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असे असतांनाही पालिकेने केलेली कारवाई आक्षेपार्ह आहे. तसेच रहिवाशांनी या नर्सिंग होममधील रुग्ण अनेकदा स्थानिकांच्या मार्गातूनच नेले जातात. त्यामुळे महिला, वृद्ध व लहान मुलांमध्ये भीती निर्माण होते, यासाठीच त्याला येथून हटविण्याची आमची मागणी असल्याचा दावा केला असला तरी या मागे काही राजकीय हित असल्याचे रुग्णालयातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत पालिकेचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रकाश जाधव यांनी सांगितले की, आयुक्तांच्या प्राप्त आदेशानुसार कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बॉम्बे नर्सिंग होम कायद्यातील तरतुदीनुसार नर्सिंग होम चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.