Join us

दिंडोशीत दारुच्या नशेत झाडल्या गोळ्या; पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात

By गौरी टेंबकर | Updated: February 26, 2024 15:10 IST

परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून काही राउंड फायर केले

मुंबई: गोरेगाव पुर्वच्या दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उंच इमारतीत गोळीबाराची घटना घडली आहे. दारुच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने रिव्हॉल्वरमधून अनेक राउंड फायर केले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वत:ला खोलीत कोंडून घेतलेल्या व्यक्तीने खोलीच्या आतून परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून काही राउंड फायर केले. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी नसून राजू रंजन नावाच्या गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला दिंडोशी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.अग्निशमन दलाने डीबी वुड बिल्डिंगमधून रंजनला बाहेर काढत त्याला दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात दिले.रंजनला दिंडोशी पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई