पाणीपट्टीच्या अभय योजनेला नागरिकांकडून अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:33 IST2021-02-05T04:33:30+5:302021-02-05T04:33:30+5:30

मुंबई : महापालिकेच्या उत्पन्नाच्या काही स्रोतांपैकी एक असलेल्या पाणीपट्टी व मलनिस्सारण कराची सुमारे अडीच हजार कोटींहून अधिक रक्कम थकीत ...

Short response from citizens to Abhay Yojana of Panipatti | पाणीपट्टीच्या अभय योजनेला नागरिकांकडून अल्प प्रतिसाद

पाणीपट्टीच्या अभय योजनेला नागरिकांकडून अल्प प्रतिसाद

मुंबई : महापालिकेच्या उत्पन्नाच्या काही स्रोतांपैकी एक असलेल्या पाणीपट्टी व मलनिस्सारण कराची सुमारे अडीच हजार कोटींहून अधिक रक्कम थकीत आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने अभय योजना आणली. मात्र, आतापर्यंत केवळ सात टक्के थकबाकी वसूल झाली असल्याचे समोर आले आहे. थकबाकी एकरकमी भरण्याची अट अनेकांना मान्य नसल्याने या योजनेला फटका बसल्याचे बोलले जात आहे.

पाणीपुरवठा केल्यानंतर पालिकेमार्फत ग्राहकांना बिल पाठविले जाते. ही बिले पाठवल्यानंतर एका महिन्याच्या कालावधीत सदर रक्कम भरणे बंधनकारक आहे. यास विलंब झाल्यास दंड आकारणी करण्यात येते. मात्र, पाणीपट्टीची थकबाकी मोठी असल्याने महापालिकेने ग्राहकांसाठी २०२० पासून अभय योजना सुरू केली. ही विशेष सूट मिळविण्याची ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु स्थायी समितीने या योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली. तरीही या योजनेला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

अभय योजनेत थकीत पाणीपट्टी एकरकमी भरल्यास अतिरिक्त आकारात सूट देण्यात येते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे सर्वच स्तरांतील लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे एकरकमी थकीत पाणीपट्टी भरणे अनेकांना शक्य होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे थकीत पाणीपट्टी एकरकमी भरण्याची अट शिथिल करण्याचे जल अभियंता विभागाने ठरवले आहे. एका महिन्याच्या आत पाणीपट्टीची रक्कम न भरल्यास त्यावर दोन टक्के अतिरिक्त आकारणी केली जाते. आतापर्यंत पाणीपट्टीची २,८१९.४४ कोटींची रक्कम थकीत आहे. मात्र, त्या रकमेच्या तुलनेत अभय योजनेनुसार केवळ १९३.४२ कोटी वसुली होऊ शकली आहे.

अभय योजना....

वर्ष कालावधी... वसूल (कोटी)... टक्केवारी

२०१०-११....१२३ दिवस.. २४६.०४ .... ३१.४४

२०१४-१५ ... १५९ दिवस.. २३४.९७ ..... २०.९६

१५-२-२०२० ते ३०-११-२०२०.. २८९ दिवस...१९३.४२ .... ६.८६

Web Title: Short response from citizens to Abhay Yojana of Panipatti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.