Short news | छोट्या बातम्या

छोट्या बातम्या

नालासोपारा : वसईच्या गोखीवरे येथील मुनीश अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सना श्याम गोलापल्ली (वय २५) या तरुणीने घरातील उंदीर मारण्याचे औषध खाल्ले होते. पतीसोबत झालेल्या किरकोळ भांडणानंतर रागाच्या भरात तिने हे कृत्य केले. तिला उपचारासाठी जवळच्या आयसिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; पण उपचारादरम्यान शनिवारी तिचा मृत्यू झाला. वालीव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

गळफास घेऊन आत्महत्या

नालासोपारा : पूर्वेकडील धानिवबाग तलावाजवळील कृष्ण सेवा संस्था चाळीत राहणाऱ्या मुकेश विनोद पटेल (वय ४५) यांनी आत्महत्या केली. शुक्रवारी राहत्या घरी कोणी नसताना लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. तुळींज पोलिसांनी शनिवारी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

वसई-विरारमध्ये १२ नवीन रुग्ण

वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत रविवारी दिवसभरात १२ रुग्ण नव्याने आढळून आले. २६ रुग्णांना विविध रुग्णालयांतून सुटी देण्यात आली. शहरात दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. शहरात अजूनही १७८ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Short news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.