तीन ठिकाणी शॉर्टसर्किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:07 IST2021-09-12T04:07:33+5:302021-09-12T04:07:33+5:30

मुंबई : मुंबई शहरात एक, पूर्व उपनगरात एक आणि पश्चिम उपनगरात एक अशा एकूण तीन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ...

Short circuit in three places | तीन ठिकाणी शॉर्टसर्किट

तीन ठिकाणी शॉर्टसर्किट

मुंबई : मुंबई शहरात एक, पूर्व उपनगरात एक आणि पश्चिम उपनगरात एक अशा एकूण तीन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. संबंधित विद्युत पुरवठा विभागास यंत्रणांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले.

पाच ठिकाणी झाडे कोसळली

मुंबई : शहरात एक, पश्चिम उपनगरात चार अशा एकूण पाच ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. तक्रारी पडताळणीकरिता संबंधित विभागांना कळविण्यात आल्या. शिवाय फांद्या उचलण्याचे काम तातडीने करण्यात आले.

धारावीत तीन रुग्ण

मुंबई : शनिवारी धारावीत कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले. तर दादर येथे सहा आणि माहीम येथे एका कोरोना रुग्णाची नोंद झाली. या विभागात एकूण दहा कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

२० आसनी दुमजली शौचालय

मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील मगन नथुराम रोडवरील भोयवाडी येथे २० आसनी दुमजली शौचालयाचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती मनसेचे स्थानिक नगरसेवक संजय तुर्डे यांनी दिली.

Web Title: Short circuit in three places