थोडक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:06 IST2021-09-27T04:06:47+5:302021-09-27T04:06:47+5:30
मुंबई : घाटकोपर-अंधेरी लिंक रोड परिसरात रस्त्यावर सोडलेल्या गाईंप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरे-कोंडवाड़ा विभागाचे ...

थोडक्यात
मुंबई : घाटकोपर-अंधेरी लिंक रोड परिसरात रस्त्यावर सोडलेल्या गाईंप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरे-कोंडवाड़ा विभागाचे अधिकारी उमेश संभाजी माणगावकर (वय ५१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
घरातील झोपेत असताना चोरी
मुंबई : वडाळा परिसरात घरातील मंडळी झोपेत असताना चोरट्याने घरात प्रवेश करीत मोबाईल पळविल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी वडाळा पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
घराचे कुलूप तोडून घरफोडी
मुंबई : घराचे कुलूप तोडून वडाळ्यातील शिवशंकर चाळीतील एका घरातून एक लाख ८० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला आहे. या प्रकरणी २३ तारखेला वडाळा पोलिसांनी अनोळखी चोराविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
केवायसी अपडेटच्या नावाखाली गंडा
मुंबई : सिमकार्ड केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली वडाळा येथील ४९ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाची एक लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी नुकताच गुन्हा नोंदवत वडाळा पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
वृद्ध सीएला ऑनलाइन गंडा
मुंबई : गिरगाव परिसरात राहणाऱ्या ७३ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटला (सीए) सिमकार्ड केवायसीच्या नावाखाली ५० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. यात एनी डेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले होते. या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांंनी रविवारी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.