किनारा सुरक्षेची वाजली ‘शिट्टी’
By Admin | Updated: August 8, 2014 00:45 IST2014-08-08T00:45:38+5:302014-08-08T00:45:38+5:30
समुद्रकिना:यांची सुरक्षितता अवलंबून असल्याने महापालिका प्रशासन मुंबईकरांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र आहे.

किनारा सुरक्षेची वाजली ‘शिट्टी’
>मुंबई : मुंबापुरीला लाभलेल्या 35 किलोमीटर समुद्रकिना:यावरील जीवरक्षकांकडे असणा:या शिट्टय़ांच्या आवाजावर समुद्रकिना:यांची सुरक्षितता अवलंबून असल्याने महापालिका प्रशासन मुंबईकरांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र आहे. गणोशोत्सव तोंडावर येऊन ठेपला तरी महापालिका प्रशासन समुद्रकिना:यावरील सुरक्षेबाबत ढिम्म असल्याने जीवरक्षकांना आवश्यक असलेल्या साहित्याची खरेदी प्रशासन कधी करणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
ऐन पावसाळ्यात आलेल्या भरती आणि ओहोटीदरम्यान समुद्रावर फिरण्यास गेलेल्या मुंबईकरावर खोल समुद्रात गेल्याने मृत्यू ओढाविण्याच्या घटना घडतात. गेल्या दोन महिन्यांत नरिमन पॉइंटसह जुहू येथील समुद्रकिनारी बुडून लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे 32 जीवरक्षक आहेत. बारा जीवरक्षक कायम असून, या जीवरक्षकांकडे आवश्यक साधने नाहीत. नरिमन पॉइंट, गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा, गोराई या मुंबईतील प्रमुख चौपाटय़ांवर महापालिकेचे जीवरक्षक तैनात आहेत. परंतु केवळ शिट्टी सोडली तर या जीवरक्षकांकडे खोल समुद्रात जाणा:या मुंबईकरांना इशारा देण्यासाठी दुसरे काहीच साधन नाही, ही वस्तुस्थिती आहे. नरिमन पॉइंट येथील एवढय़ा मोठय़ा समुद्रकिनारी केवळ एक जीवरक्षक तैनात असतो आणि त्याच्या जोडीला दोन पोलीस हवालदार असतात, ही वस्तुस्थिती आहे.
गिरगाव, जुहू आणि उर्वरित चौपाटय़ांवरील परिस्थिती काही फारशी वेगळी नाही. महत्त्वाचे म्हणजे या जीवरक्षकांचा समुद्रकिना:यावरील एक राउंड पूर्ण होईर्पयत दुस:या बाजूकडील गर्दी वाढलेली असते. तेथील खोल समुद्रात उतरणा:या मुंबईकरांना इशारा देता देता जीवरक्षकांच्या नाकी नऊ येतात. मागील दोन आठवडय़ांमधील चित्र पाहिले असता नरिमन पॉइंट आणि गिरगाव चौपाटी येथे हे प्रामुख्याने निदर्शनास आले.
गिरगाव चौपाटीवर दक्षिणोकडील बाजूला काहीच सुरक्षा नसल्याने येथे आलेले पर्यटक खोल समुद्रात उतरले होते. आणि केवळ मध्यभागी सुरक्षा तैनात असल्याने तेथील पर्यटकांना खोल समुद्रात उतरू नये, असा इशारा देण्यात येत होता. तर गिरगावच्या उत्तरेकडील बाजूवर दक्षिणोसारखीच स्थिती होती. हेच चित्र नरिमन पॉइंट येथे पाहण्यास मिळाले. मागील दीडएक महिन्यात नरिमन पॉइंट येथे दोन वेळा दुर्घटना घडूनही फारशी काही सुरक्षा बाळगण्यात आलेली नाही; हे दुर्दैव आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेतील सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, जीवरक्षकांसाठी आवश्यक असणा:या साहित्याची खरेदी करण्यासाठीचा प्रस्तावदेखील मंजूर झाला आहे. मात्र साहित्याची खरेदी काही अद्याप झालेली नाही.
महापालिकेकडे बेसिक लाइफसपोर्ट, लाइफ ज्ॉकेट, ट्रॉली, ऑक्सिजन सिलिंडर, टेहाळणी मनोरा आणि दुर्बीण, दोरी, रेस्क्यू टय़ूब, स्पीड बोट, स्ट्रेचर, अॅम्ब्युलन्स, जेट स्की, हँड सायरन ही साधने उपलब्ध नाहीत.
मुंबईतील आक्सा, वर्सोवा, गोराई, जुहू, दादर, गिरगाव या मुंबईतील सहा प्रमुख चौपाटय़ांपैकी आक्सा चौपाटी जीवघेणी आहे.