पोलादपूर बाजारपेठेत दुकानाला आग
By Admin | Updated: October 25, 2014 22:03 IST2014-10-25T22:03:34+5:302014-10-25T22:03:34+5:30
शहरातील बाजारपेठेतील सुप्रसिद्ध कापड व्यापारी निवासशेठ यांच्या दुकानाशेजारील विलास तलाठी, सुरेश जाधव यांचे जुने घर व शरद बुटालना यांच्या जुन्या घरांना गुरुवारी रात्री 12.45 च्या दरम्यान आग लागली.

पोलादपूर बाजारपेठेत दुकानाला आग
पोलादपूर : शहरातील बाजारपेठेतील सुप्रसिद्ध कापड व्यापारी निवासशेठ यांच्या दुकानाशेजारील विलास तलाठी, सुरेश जाधव यांचे जुने घर व शरद बुटालना यांच्या जुन्या घरांना गुरुवारी रात्री 12.45 च्या दरम्यान आग लागली. या आगीत ही घरे भस्मसात झाली. घरात साठवणूक केलेल्या फटाक्यांच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे स्पष्ट झाले असून जागरूक नागरिकांच्या सतर्कतेने सुदैवाने जिवीतहानी टळली. यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलादपूर ग्रामस्थ व युवासेनेचे कार्यकर्ते तसेच पोलादपूर पोलिसांनी तत्परतेने घरातील व्यक्तींना बाहेर काढले, तसेच महाड नगरपरिषद, एमआयडीसी येथील अगAीशामन दलाच्या गाडय़ा ताबडतोब घटनास्थळी पोहचल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. खेड नगरपरिषदेची गाडी सुद्धा वेळेत पोहचली. या घटनेची माहिती मिळताच विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हा युवा सेना अधिकारी विकास गोगावले हे घटनास्थळी पोहचले. उपविभागीय अधिकारी देशमुख, पोलीस निरीक्षक संजय पाटील, बाळासाहेब गोडगे हे घटनास्थळी हजर होते.
विनापरवाना फटाके या ज्वालाग्राही व स्फोटक पदार्थाची विक्री करण्याच्या हेतूने कोणतीही सुरक्षिततेची खबरदारी न घेता साठवणूक केलेल्या फटाक्याचा स्फोट झाला. यावेळी दुकानात व घरात आग लागून एकूण 8 ते 1क् लाख रुपयांचे नुकसान होण्यास कारणीभूत ठरलेल्या सचिन शरद बुटाला व आशिष शरद बुटाला या दोघा दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून डीवायएसपी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस करत आहेत. (वार्ताहर)