Join us  

मालाडमध्ये शॉपिंग गाळ्याला आग, सुदैवाने कुणालाही दुखापत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 5:36 AM

मुंबई -  शहरात रात्री ०८:०२ वाजताच्या सुमारास मालाड, परमार हाऊस इंडस्ट्रीयल इस्टेट, मालेदारवाडी, काचपाडा येथे गाळ्याला (तळ+३ मजली) आग लागली होती.  ...

मुंबई -  शहरात रात्री ०८:०२ वाजताच्या सुमारास मालाड, परमार हाऊस इंडस्ट्रीयल इस्टेट, मालेदारवाडी, काचपाडा येथे गाळ्याला (तळ+३ मजली) आग लागली होती.  त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सदरची आग लेवल ३ ची असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला संपूर्ण यश आले. 

सदर घटनास्थळी मुंबई अग्नीशमन केंद्राचे ४-फा. वा., १-वॉटर टँकर, ४ जम्बो वॉटर टँकर, १ रेस्क्यू वाहन, २ रुग्णवाहिका उपस्थित झाल्या होत्या. या आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे माहिती मुंबई आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली आहे. 

टॅग्स :आगमुंबईमालाड पश्चिम