Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदार थंड पाणी आणि कोल्ड्रिंकच्या कूलिंगचे जादा पैसे घेतोय? कुठे करायची तक्रार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 16:43 IST

सध्या मुंबईत पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. त्यामुळे उकाड्यावर उतारा म्हणून कूलिंगचे थंड पाणी आणि शीतपेयांची मागणी वाढली आहे.

मुंबई

सध्या मुंबईत पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. त्यामुळे उकाड्यावर उतारा म्हणून कूलिंगचे थंड पाणी आणि शीतपेयांची मागणी वाढली आहे. प्रत्यक्षात एमआरपीत कूलिंग चार्जेसचा समावेश असतो. मात्र, काही ठिकाणी नियमांना बगल देत, कूलिंगच्या नावाखाली जास्त पैसे घेतल्याच्या तक्रारी आहेत. कूलिंगच्या नावाखाली जर कोणी जास्त पैशांची मागणी करत असेल, तर थेट ग्राहक मंचात तक्रार करता येते. 

हॉटेलमध्ये देखील ग्राहकांची थंड पाणी, कोल्ड्रिंकची मागणी मोठ्या प्रमाणात असते. हॉटेलमध्ये ग्राहकांना सेवा दिली जाते. त्यामुळे पाणी, कोल्ड्रिंक्स, ताक आदी पेय एमआरपीपेक्षा अधिक दराने विकण्याची त्यांना मुभा आहे. हॉटेलनिहाय सदर पेयांचे दर ठिकठिकाणी वेगवेगळे असतात. 

अतिरिक्त शुल्क देऊ नकाथंड पेय, कोल्ड्रिंक विक्री करताना त्यांची एमआरपी किंमत निर्देशित केली असते. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नसते. ग्राहकांची फसवणूक करत आणि त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत ते जादा पैशांची मागणी करतात. जर कूलिंग चार्जेसच्या नावाखाली जर जास्त पैसे घेतले तर नागरिकांना ग्राहक मंचाकडे तक्रार करता येते. 

थंड कोल्डिंक विकणे ही तर त्यांची जबाबदारीसध्याच्या कडाक्याच्या उन्हात ग्राहकांची थंड पाणी, थंड अपेयांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोल्डिंक विकणे ही तर दुकानदारांची जबाबदारीच आहे. ते कोल्ड्रिंक थंड करण्याचे अतिरिक्त पैसे ग्राहकांकडून मागू शकत नाही. 

थंड पेय, कोल्ड्रिंक विक्री करताना त्यांची एमआरपी किंमत निर्देशित केली असते. त्यामुळे किंमत निर्देशित केली असते. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नसते. मात्र ग्राहकांकडून जादा पैशांची मागणी जर दुकानदार करत असतील तर त्यांच्या विरोधात ग्राहक जिल्हा ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार करू शकता. - अॅड. शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत

टॅग्स :मुंबई