शंभर कोटींच्या सोन्याची खरेदी
By Admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:40+5:302014-10-03T22:56:40+5:30
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा अर्थात विजयाशमीच्या मुहूर्तावर ठाणो शहर आणि जिल्हयात सुमारे 3क्क् किलोच्या सोन्यातून साधारण 1क्क् कोटींच्या सोने खरेदीची उलाढाल झाली आहे.

शंभर कोटींच्या सोन्याची खरेदी
>जितेंद्र कालेकर - ठाणो
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा अर्थात विजयाशमीच्या मुहूर्तावर ठाणो शहर आणि जिल्हयात सुमारे 3क्क् किलोच्या सोन्यातून साधारण 1क्क् कोटींच्या सोने खरेदीची उलाढाल झाली आहे. तर
नामांकित मोठया सराफाच्या दुकानांमध्ये एकाच दिवसात साधारण 1क्किलोचे
म्हणजे तीन कोटींच्या सोन्याची खरेदी झाल्याची माहिती सोने चांदीच्या व्यापा:यांनी दिली.
दस:याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सकाळी तसा अल्प प्रतिसाद होता. दुपारनंतर आणि सायंकाळी 8 वा. पर्यन्त मोठया संख्येने ठाणोकरांनी सोने खरेदीचा आनंद लुटला. यामध्ये विशेष करुन वाळे आणि नाणी तसेच दागिन्यांमध्ये नेकलेस, बांगडया आणि मंगळसूत्रची महिलांनी मोठया प्रमाणात खरेदी केल्याची माहिती महाराष्ट्र सुवर्णकार मंडळाचे सदस्य नितिन कदम यांनी ‘लोकमत’ ला दिली.
शुक्रवारी 24 कॅरेटसाठी सोन्याचा भाव 27 हजार 9क्क् तर 22 कॅरेटसाठी 26 हजार 6क्क् होता. गेल्या काही दिवसांत आलेल्या सोन्याच्या भावातील घसरणीमुळेही सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल होता. अशीच खरेदी कल्याण, डोंबिवली, शहापूर, उल्हासनगर आणि मीरा भाईदर तसेच नवी मुंबईतही झाल्याची माहिती सूत्रंनी दिली. जिल्हाभर 3क्क् किलोच्या सोन्याच्या दागिन्यांमधून साधारण 9क् ते 1क्क् कोटींची उलाढाल झाल्याचे माहिती
व्यापारी संघटनेच्या एका पदाधिका:याने सांगितले.
मुहूर्ताच्या सोने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली असली तरी अनेकजण जुने दागिने आणून त्याची मोड करुनही नविन दागिने घडवितात. त्यामुळे या खरेदीमध्ये सर्वच नवीन दागिने खरेदी करतात, असेही नसते, असेही जेम्स अॅन्ड ज्वेलरी फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य सुबोध पेठे यांनी सांगितले. तरीही सोने खरेदीसाठी ग्राहकांमध्ये यंदाही ब:यापैकी उत्साह होता, असेही ते म्हणाले.
ठाणो शहरात 24क् तर जिल्हयात अडीच हजार सराफांची दुकाने आहेत. ठाणो शहरातील नामांकित दहा दुकानांमध्ये आज प्रत्येकी 1क् किलोचे सोने तीन कोटींप्रमाणो 3क् कोटींची उलाढाल झाल्याची माहिती एका बडया व्यापा:याने दिली.
4वसई-विरार उपप्रदेशात गेले 9 दिवस नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा गरबा खेळण्यासाठी रात्री उशीरार्पयत वेळ देण्यात आल्यामुळे तरूणाईमध्ये उत्साह निर्माण झाला होता. आज विजयादशमीच्या मुहूर्तावर वसई-विरारकरांनी उत्साहात सोने लुटले. तसेच अनेक दुकानामध्ये सोने खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीचा नवरात्र सुरू होतो. घटस्थापनेनंतर सलग 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार
पडतात.
4या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये देवीच्या मंदिरात असलेला दिप सतत तेवत ठेवतात. रात्री देवीची यथासांग पुजा झाल्यानंतर गरबा खेळला जातो. यंदा वसई-विरार परिसरात अनेक भागात नवरात्र मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. रात्री उशीरार्पयत गरबा खेळण्यात आला. यावेळी पोलीसांनीही कार्यक्रमासाठी सवलत दिल्यामुळे तरूणाई खुश होती. शुक्रवारी दस:याच्या दिवशी अनेक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने आपापल्या देवीच्या मुर्तीचे विधीवत पूजा करून विसर्जन केले.