Join us  

'सलमान, हा तर फक्त ट्रेलर आहे', गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने घेतली हल्ल्याची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 3:05 PM

लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने फेसबूक पोस्टद्वारे हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

Salman Khan News: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली असून, पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. हा हल्ला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ, अनमोल बिश्नोई याने केल्याचा दावा सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे. 

लॉरेन्सच्या भावाने घेतली जबाबदारी मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत बसलेल्या अनमोल बिश्नोई याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून सलमान खानवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्या व्हायरल पोस्टमध्ये लिहिले की, "आम्हाला शांतता हवी आहे. अन्यायाविरोधातील निर्णय युद्धातून होणार असेल, तर युद्ध योग्य आहे. सलमान खान, तुला आमची ताकद दाखवण्यासाठी आम्ही हे केले. हा तर फक्त ट्रेलर आहे. ही आमची पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. यानंतर रिकाम्या घरावर गोळ्या झाडणार नाही. ज्या दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलला तू देव मानतोस, त्यांच्या नावाने आम्ही कुत्रा पाळले आहेत. लॉरेन्स बिश्नोई ग्रुप, गोल्डी ब्रार ग्रुप, काला जथेडी ग्रुप, रोहित गोदरा ग्रुप," अशाप्रकारचा मजकूर या पोस्टमध्ये आहे. लोकमत या दाव्याला दुजोरा देत नाही.

घराबाहेर गोळीबार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सलमान खानला फोन, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

सलमान खान-लॉरेन्स बिश्नोईचे जुने वैरसलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईचे जुने वैर आहे. काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोईकडून सलमानला अनेक धमक्या येत आहेत. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेतहीही वाढ करण्यात आली आहे. असे असतानाही रविवारी पहाटे 4.50 वाजता दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी पाच राऊंड गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. दोघांनी हेल्मेट घातले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. 

टॅग्स :सलमान खानमुंबईगोळीबारगुन्हेगारी