वर्सोव्यात हवेत गोळीबार; अवघ्या नऊ तासांत आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:07 IST2020-12-31T04:07:07+5:302020-12-31T04:07:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पूर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या प्रियकराला धमकावण्यासाठी एका तरुणाने मंगळवारी हवेत गोळीबार केला. वर्सोवा पोलिसांनी अवघ्या नऊ ...

वर्सोव्यात हवेत गोळीबार; अवघ्या नऊ तासांत आरोपीला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पूर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या प्रियकराला धमकावण्यासाठी एका तरुणाने मंगळवारी हवेत गोळीबार केला. वर्सोवा पोलिसांनी अवघ्या नऊ तासांत त्याला अटक केली.
अल्ताफ सय्यद असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. माहिममध्ये त्याचे मोबाइलचे दुकान आहे. मंगळवारी तो आणि त्याचा मित्र वसिम शेख हे अंधेरीच्या चार बंगला परिसरात आले होते. तेथे सय्यदची भेट त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या मित्रासोबत झाली. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि त्याला धमकावण्यासाठी सय्यदने हवेत गोळीबार केला. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लाेक घाबरले.
वर्सोवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रुऊफ शेख यांना याची माहिती मिळताच त्यांनी तपासाअंती सय्यदला माहिम डेपोमधून अटक केली. त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले. सय्यदने बंदूक कुठून आणली, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.
............................