Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दोनशे रुपयांच्या बिलासाठी वेटरची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 04:18 IST

प्रभादेवी येथील बाळ शेठ मुडुळकर मार्गावरील रेड रोज कंट्री बारमध्ये ही घटना घडली

मुंबई : दोनशे रुपयांच्या बिलासाठी ग्राहकाने वेटरची हत्या केल्याची घटना प्रभादेवीमध्ये गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी शैलेंद्र गुप्ता (३२) याला बेड्या ठोकल्या आहेत.

प्रभादेवी येथील बाळ शेठ मुडुळकर मार्गावरील रेड रोज कंट्री बारमध्ये ही घटना घडली. याच बारमध्ये गणेश लक्ष्मण जानवलेकर (४९) हा वेटर म्हणून नोकरी करायचा. गुरुवारी रात्री ११च्या सुमारास गुप्ता नेहमीप्रमाणे दारू पिण्यासाठी तेथे आला. अर्ध्या तासाने गणेशने त्याच्याकडे दारूचे दोनशे रुपये मागितले. मात्र, ज्याने दारू आणून दिली, त्याच्याचकडे पैसे देईल, असे सांगून त्याने गणेशला शिवीगाळी सुरू केली. पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. गुप्ताने रागाच्या भरात बर्फ फोडण्याच्या टोकदार वस्तूने गणेशवर हल्ला चढविला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहताच तेथून पळ काढला. या घटनेमुळे बारमध्ये खळबळ उडाली. घटनेची वर्दी लागताच, तेथे दाखल झालेल्या एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी गणेशला जे. जे. रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :मुंबईखून