Join us  

कोरोना रूग्णांवर उपचार करता -करता कुटुंबालाच झाली लागण, संपूर्ण कुटुंबाचा आला कोरोना पॉझिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 5:15 PM

दिवसभर पीपीई किटस घातल्यामुळे अनेक गोष्टींच्या समस्यांना डॉक्टरांना सोमोरे जावे लागत आहेत.

भारतात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस लाखांवर पोहचली आहे. देशात कोरोना विषाणूंचा संसर्ग गंभीर स्वरूप धारण करत आहे. जगभरात भारताचा 11वा नंबर लागतो. तर, संक्रमणाच्या बाबतीत आशियात तिस-या नंबरवर आहे. विविध स्तरांवरून प्रत्येकजण कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत. 

कोरोना वॉरिअर्स दिवसरात्र जीवाची बाजी लावत कोरोना रूग्णांची सेवा करत आहेत. अशात धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आता तर डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागाचे अधिकारी, सफाई कर्मचारी आणि पोलीस यांनाही कोरोनाची लागण होत आहे.  'Humans of Bombay' नावाच्या फेसबुकवर पोस्टवर मुंबईच्या एका डॉक्टरांचा कोरोनाबाबतचा अनुभव शेअर करण्यात आला आहे. यात एका डॉक्टरांनी त्यांच्या कामाते स्वपूप सांगताना अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. रोज 5-10 रुग्णांवर मी उपचार करत होतो, याकाळात स्वत:च्या सुरक्षेचीही काळजी घेतली". मात्र 18 मार्च रोजी या डॉक्टरांना ताप आला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदललं. डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. संपूर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला होता.

तसेच पीपीई किटही घालणे खूप त्रासदायक ठरत आहे.दिवसभर पीपीई किटस घातल्यामुळे अनेक गोष्टींच्या समस्यांना डॉक्टरांना सोमोरे जावे लागत आहेत.शरिरावर पुरळ उठणे,रॅशेस पडणे अशा जखमाही त्यांच्या अंगावर होत आहे. मात्र स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता डॉक्टर रूग्णांची जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत.             

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस