Join us  

धक्कादायक : मुंबई उपनगरीय रेल्वेवरील ४३ पूल धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 5:26 AM

मुंबई उपनगरी रेल्वेवरील ४३ पुलांना ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच त्यांचे आयुष्य-गॅरंटी संपली आहे.

मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वेवरील ४३ पुलांना ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच त्यांचे आयुष्य-गॅरंटी संपली आहे. त्यात टिळक पूल, भायखळा पूल, आर्थर रोड पूल, सायन पूल यांचाही समावेश आहे. अजूनही हे सर्व पूल वापरात आहेत. त्यामुळे महापालिका आणि रेल्वे प्रशासन या पुलांच्या दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा अंधेरी पूल दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची वाट पाहत आहे का? असा मुंबईकरांकडून उपस्थित करण्यात येत आहे.रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी मुंबई रेल्वेवरील पुलांचा तपशील माहिती अधिकारांतर्गत मागविला होता. माहिती अधिकारातील तपशिलानुसार, पुलांच्या अंदाजे कालमर्यादांची माहिती उपलब्ध नाही. कल्याण स्थानकाजवळील जुना पत्री पूल (आरओबी) आणि घाटकोपर स्थानकाजवळील (कल्याण दिशेकडील आरओबी) वगळता अन्य पूल मोडकळीस आलेले नाहीत. ते सुस्थितीत असल्याचा दावा रेल्वेने केला आहे.माहिती अधिकारानुसार, मुंबई उपनगरीय भागातील ४३ रेल्वेवरील पुलांना ६० वर्षे पूर्ण झाली असून, अद्यापही ते वापरात आहेत. यात १९ आरओबी (आरओबी) २४ पादचारी पूल (एफओबी) पुलांचा समावेश आहे, तर १५ आरओबीची आणि ४ पादचारी पुलांची माहिती उपलब्ध नाही.अंधेरी पूल दुर्घटनेनंतर आयआयटीच्या नेतृत्वाखाली रेल्वे आणि महापालिका यांच्या संयुक्त पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सद्यस्थितीत पथकाने चार पुलांची पाहणी केली असून, या पाहणींतर्गत लोअर परळ येथील पूल धोकादायक ठरविण्यात आला. मुंबईतील पुलांच्या पाहणीसाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. पाहणीनंतर त्याचा अहवाल आल्यावर पुढील माहिती मिळेल.या उड्डाणपुलांच्या उभारणीचा तपशील नाही...महापे, पनवेल, वाशी लिंक रोड, शीव-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग, सानपाडा, वाशी-सानपाडा, जुईनगर-नेरूळ, सी-वूड्स, सीबीडी बेलापूर, मानसरोवर-खांदेश्वर, खांदेश्वर-पनवेल, खांदेश्वर आरओबी या पुलांच्या उभारणीची माहिती रेल्वे प्रशासनाक डे नसल्याचे माहिती अधिकातून प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार स्पष्ट होते.

टॅग्स :मुंबईमुंबई लोकलरेल्वे