Join us  

राज ठाकरेंच्या पत्रानंतर ठाकरे सरकारला जाग; ऊर्जामंत्र्यांचे वीज कंपन्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 6:50 PM

कोरोनाच्या काळात ग्राहकांना महावितरण, अदानी, टोरेंट आदी वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या अवाजवी वीजबिले पाठवत आहेत. याप्रकरणी नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी येत आहेत

ठळक मुद्देकोरोनाच्या काळात ग्राहकांना महावितरण, अदानी, टोरेंट आदी वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या अवाजवी वीजबिले पाठवत आहेत. याप्रकरणी नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी येत आहेत

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यातल्या जनतेला वाढीव वीज बिलाचा सामना करावा लागत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असताना वीज बिलामुळे अनेकांचं कंबरडं मोडलं आहे. या प्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होत. राज ठाकरेंच्या पत्रानंतर राज्य सरकारला जाग आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत, ऊर्जामंत्र्यांनी वीजकंपन्याना निर्देश दिले आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी वीज कंपन्यांना सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खासगी वीज कंपन्यांनादेखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खासगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, अशी आक्रमक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारी आणि खासगी वीज कंपन्यांनी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलं पाठवली आहेत. राज ठाकरेंनी याच संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित कार्यवाही करण्याची मागणी केली. वीज कंपन्यांनी पाठवलेली बिलं म्हणजे ग्राहकांची लूट आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाची शाश्वती नसताना वाढीव वीज बिल पाठवणं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करण्यासारखं असल्याचं राज यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या या पत्रानंतर तत्काळ ऊर्जामंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. 

कोरोनाच्या काळात ग्राहकांना महावितरण, अदानी, टोरेंट आदी वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या अवाजवी वीजबिले पाठवत आहेत. याप्रकरणी नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी येत आहेत. त्याच अनुषंगाने अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करता स्लॅबनुसार बिल आकारण्याचे निर्देश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांना दिले आहेत. यासंदर्भात कामगारमंत्री नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरु माहिती दिली.  

टॅग्स :राज ठाकरेशिवसेनाकोरोना वायरस बातम्यावीजनितीन राऊत