शॉक लागून म्हशीचा मृत्यू
By Admin | Updated: October 9, 2014 22:40 IST2014-10-09T22:40:06+5:302014-10-09T22:40:06+5:30
मुरुड तालुक्यातील शीघ्रे ग्रामपंचायत हद्दीमध्ये विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने अशोक पाटील यांच्या मालकीच्या म्हशीचा मृत्यू झाला.

शॉक लागून म्हशीचा मृत्यू
आगरदांडा : मुरुड तालुक्यातील शीघ्रे ग्रामपंचायत हद्दीमध्ये विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने अशोक पाटील यांच्या मालकीच्या म्हशीचा मृत्यू झाला.
४ आॅक्टोबर रोजी झालेल्या चक्रीवादळामध्ये बहुतांशी विजेच्या तारा रस्त्याच्या कडेला शेतामध्ये लोंबकळत होत्या. येथे म्हैस चरायला गेली असता वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने तिचा मृत्यू झाला.
या शेतकऱ्याला वीज मंडळाकडून भरपाई मिळावी, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)