२४ टपोरींना वर्षभरात शॉक
By Admin | Updated: January 22, 2015 01:03 IST2015-01-22T01:03:51+5:302015-01-22T01:03:51+5:30
रेल्वेतून पडणे, रूळ ओलांडणे, लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडून मृत्यू होणे आदी दुर्घटनांमध्ये रेल्वे प्रशासनालाच जबाबदार धरले

२४ टपोरींना वर्षभरात शॉक
मुंबई : रेल्वेतून पडणे, रूळ ओलांडणे, लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडून मृत्यू होणे आदी दुर्घटनांमध्ये रेल्वे प्रशासनालाच जबाबदार धरले जात असतानाच दुसरीकडे प्रवासीच आपला जीव धोक्यात घालत मृत्यूला कवटाळत आहेत. गेल्या वर्षभरात लोकलच्या टपावरून प्रवास करणाऱ्या २४ टपोरींना इलेक्ट्रिक शॉकमुळे आपला जीव गमवावा लागला आहे, तर ३३ जणांनी रेल्वेत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
रेल्वेच्या विविध अपघातांत २0१४ मध्ये ३ हजार ४२३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २ हजार ९९८ पुरुष आणि ४२५ महिला प्रवाशांचा समावेश आहे. रेल्वेरूळ ओलांडण्याच्या, गाडीतून पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.
लोकल गाड्यांना होणारी गर्दी तसेच स्थानकांजवळ सोयीसुविधा नसल्याने ट्रॅक ओलांडण्याचे होणारे प्रकार यामुळेच या दोन घटनांमध्ये मोठी वाढ असल्याचे सांगितले जाते. मात्र असे असतानाही रेल्वे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीत लोकलच्या टपावरून प्रवास करणाऱ्या आणि आत्महत्या करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाणही अधिक असल्याचे समोर आले आहे.
यातून अनेक प्रवाशांनाच जीवन नकोसे झाले आहे की काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. २0१४ मध्ये टपावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे २४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर ३३ जणांनी लोकलखाली आत्महत्या केल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. यामध्ये २८ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. मध्य रेल्वेमार्गावर २0 आणि पश्चिम रेल्वेमार्गावर १३ आत्महत्यांचा समावेश आहे.(प्र्रतनिधी)
सीएसटी——
दादर——
कुर्ला१0—
ठाणे२३
डोंबिवली३—
कल्याण७२
कर्जत—३
वडाळा१—
वाशी——
पनवेल—२
चर्चगेट—४
मुंबई सेंट्रल१६
वांद्रे३—
अंधेरी——
बोरीवली२—
वसई३३
पालघर—0