कोळी उमेदवारांच्या प्रचारासाठी शोभाताई फडणवीस वेसाव्यात

By Admin | Updated: February 17, 2017 18:06 IST2017-02-17T18:06:20+5:302017-02-17T18:06:20+5:30

वेसावे कोळीवाड्यातील डॉ. गजेंद्र भानजी कुटुंबाचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि युती सरकारच्या काळातील माजी अन्न पुरवठा आणि रोजगार हमी

Shobhatai Fadnavis Vesavya for the campaign of fishermen candidates | कोळी उमेदवारांच्या प्रचारासाठी शोभाताई फडणवीस वेसाव्यात

कोळी उमेदवारांच्या प्रचारासाठी शोभाताई फडणवीस वेसाव्यात

>ऑनलाइन लोकमत/मनोहर कुंभेजकर
मुंबई, दि. 17 - वेसावे कोळीवाड्यातील डॉ. गजेंद्र भानजी कुटुंबाचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि युती सरकारच्या काळातील माजी अन्न पुरवठा आणि रोजगार हमी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. त्या भाजपाच्या यवतमाळच्या प्रभारी आहेत. तेथील प्रचार संपवून त्या खास दुपारी वेसावे आणि खरदांडा येथील भाजपाच्या येथील उनेदवारांच्या प्रचारासाठी आल्या आहेत.                                डॉ.गजेंद्र भानजी हे कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष आहेत.आज दुपारी  नागपूरवरून वेसावे कोळीवाड्यात शोभाताई फडणवीस यांचे आगमन झाले. त्या डॉ. भानजी यांची कन्या आणि वेसावे कोळीवाड्यातील प्रभाग क्र 59 च्या भाजपा उमेदवार डॉ. प्रिया भानजी आणि त्यांचा मुलगा जयेंद्र भानजी हा खारदांडा येथील प्रभाग क्र 99 मधून अनुसूचित जमातीच्या तिकीटावर  हे दोघे उच्च शिक्षित बहीण-भाऊ निवडणूक लढवत आहे. त्यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांचा मुक्काम तीन दिवस असून त्या प्रचारात आणि जाहिर सभांमध्ये भाग घेणार असून या दोघा बहीण भावाला निवडून आणण्याचे आवाहन त्या येथील मत दारांना करणार करणार असून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीक्षेपतील मुंबईचा पारदर्शी आणि सर्वांगिण विकास करण्यासाठी मुंबईत भाजपाला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन करणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली.
आज पर्यंत कोळी समाजाचा फक्त मत्तांसाठी उपयोग झाला, मात्र आजही त्यांच्या मासेमारी,घरबांधणी, पाणी आणि अन्य समस्या सुटल्या नाहीत.मुंबईच्या दुषीत पाण्यातच त्यांना मासेमारी करावी लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.हे चित्र बदलण्यासाठी मुंबईत भाजपाची सत्ता पाहिजे असे ठाम मत त्यांनी शेवटी व्यक्त केले. यावेळी डॉ. गजेंद्र भानजी,कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके आणि युवा अध्यक्ष चेतन पाटील,उपा ध्यक्ष प्रकाश बोबडी,उमेदवार डॉ. प्रिया भानजी आणि जयेंद्र भानजी उपस्थित होते.
 
 

Web Title: Shobhatai Fadnavis Vesavya for the campaign of fishermen candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.