कालच्या हाणामारीवर शिवसेनेची तहकुबी

By Admin | Updated: May 17, 2015 01:33 IST2015-05-17T01:33:29+5:302015-05-17T01:33:29+5:30

ठाणे महापालिकेच्या आवारात कॉंग्रेसच्याच दोन नगरसेवकांत झालेल्या राड्यामुळे नगरसेवकांची प्रतिमा डागाळली गेली.

Shivsena's Tahqubi on yesterday's crusade | कालच्या हाणामारीवर शिवसेनेची तहकुबी

कालच्या हाणामारीवर शिवसेनेची तहकुबी

घोडबंदर : ठाणे महापालिकेच्या आवारात कॉंग्रेसच्याच दोन नगरसेवकांत झालेल्या राड्यामुळे नगरसेवकांची प्रतिमा डागाळली गेली. शिवसेनेने या घटनेचा निषेध करत अर्थसंकल्पाची चर्चा रोखून धरली आणि ही सभा पूर्णवेळ तहकूब केली. शनिवारी अर्थसंकल्पावर महासभेत चर्चा होणार होती. शिवसेनेने मांडलेला तहकुबी ठराव महापौरांनी स्वीकारून सभा तहकुबीस मान्यता दिली. विरोधकांनी त्यावर तीव्र आक्षेप घेत महापौरांचा निषेध केला.
विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी या तहकुबीला विरोध केला. शुक्र वारी घडलेल्या घटनेनंतर माजी महापौर अशोक वैती यांनी तत्काळ सभा तहकुबी मांडली होती तेंव्हा महापौर संजय मोरे यांनी ती तहकुबी फेटाळून लावली असताना एका रात्रीत असे काय घडले कि आज पुन्हा तहकुबी मांडावी लागत आहे. आदेशावर हे सर्व चाललाय का ? असा सवाल त्यांनी केला. यापूर्वी तत्कालीन उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना मारहाण झाली तेव्हा का नाही कारवाईची मागणी केली. असा टोला विरोधी पक्षाने हाणला.
उपमहापौर मारहाण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर सभागृहात चर्चा करणे योग्य ठरणार नसल्याचे स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांनी सांगितले. (वार्ताहर)

कॉंग्रेस नगरसेवक
कॉंग्रेस नगरसेवक विक्र ांत चव्हाण आणि राजन किणे यांच्यात पालिकेत मारामारी झाली होती. याबाबत प्रशासनाने कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी शिवसेना नगरसेवकांनी मागणी केली यासाठी सभा पूर्ण वेळ तहकूब करण्याची मागणी केली.

Web Title: Shivsena's Tahqubi on yesterday's crusade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.