मांसविक्री बंदीला शिवसेनेचा विरोध
By Admin | Updated: September 10, 2015 03:37 IST2015-09-10T03:37:52+5:302015-09-10T03:37:52+5:30
मुंबई, मीरा-भार्इंदर या महापालिकेमध्ये चार ते आठ दिवस मांसविक्री करण्याबाबत लागू केलेली बंदी अन्यायकारक असून, ती अमलात आणू देणार नाही, असा इशारा शिवसेना

मांसविक्री बंदीला शिवसेनेचा विरोध
मुंबई : मुंबई, मीरा-भार्इंदर या महापालिकेमध्ये चार ते आठ दिवस मांसविक्री करण्याबाबत लागू केलेली बंदी अन्यायकारक असून, ती अमलात आणू देणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. भाजपाने या बंदीकरिता आग्रह धरला असल्याने शिवसेनेने भाजपाविरोधात दंड थोपटले असल्याचे दिसत आहे.
जैनधर्मीयांच्या पर्युषण काळात मांसविक्रीवर घालण्यात आलेली बंदी वादविषय ठरली आहे. राज्य शासनाने मांसविक्रीवर दोन दिवसांच्या बंदीचा निर्णय घेतला असताना मीरा-भार्इंदर, मुंबई व नवी मुंबई या महापालिकांनी चार ते आठ दिवस बंदीचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व सपा यांनी या बंदीला विरोध केला असताना आता शिवसेनेनेही या वादात उडी ठोकली आहे.
शिवसेनेचा अशा बंदीला
विरोध असून, कुणालाही अशी बंदी लादता येणार नाही. तसे कुणी करीत असेल तर ते शिवसेना स्वीकारणार नाही. ही बंदी अमलात येणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी
दिला. (विशेष प्रतिनिधी)