सरसकट पाणीपुरवठ्यास शिवसेनेचा विरोध

By Admin | Updated: December 2, 2014 00:53 IST2014-12-02T00:53:57+5:302014-12-02T00:53:57+5:30

पाणीचोरीवर निर्बंध आणण्यात अपशय आल्यानंतर सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याची मंजुरी देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या पटलावर ठेवला

Shivsena's opposition to all the water supply | सरसकट पाणीपुरवठ्यास शिवसेनेचा विरोध

सरसकट पाणीपुरवठ्यास शिवसेनेचा विरोध

मुंबई : पाणीचोरीवर निर्बंध आणण्यात अपशय आल्यानंतर सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याची मंजुरी देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या पटलावर ठेवला आहे़ मात्र शिवसेनेने सरसकट पाणीपुरवठा करण्यास विरोध दर्शविला आहे़ याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा वितरणाचे धोरणच निश्चित करण्यास शिवसेनेने प्रशासनाला बजावले आहे़
सद्य:स्थितीत १९९५ पर्यंतच्या झोपड्यांना पाणीपुरवठा केला जातो़ मात्र निवडणुकीच्या काळात ही डेडलाइन अनेक वेळा बदलली आहे़ पाणीचोरीवर अंकुश आणणेही अवघड जात असल्याने २००० पर्यंतच्या झोपड्यांना पाणी देण्याची अनुमती मिळण्याचा युक्तिवाद पालिकेने यापूर्वी अनेक वेळा शासनाकडे मांडला आहे़ मात्र या प्रस्तावाला पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने नकारघंटा वाजवली आहे़
महापौर स्नेहल आंबेकर यांच्या दादर येथील निवासस्थानी नुकत्याच झालेल्या बैठकीत शिवसेनेने आपला विरोध प्रशासनाला कळविला़ सरसकट सगळ्यांनाच पाणीपुरवठा केल्यास मूळ करदात्यांवर अन्याय होईल़ त्यांना सुरळीत पाणीपुरवठा कसा होणार, असे प्रश्न सेनेने उपस्थित केले़ मात्र सरसकट सगळ्यांनाच पाणी दिल्यास पाणीचोरीचे प्रमाण घटेल, असा प्रशासनाला होरा आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Shivsena's opposition to all the water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.