भाजपा उमेदवाराच्या ठाकरेप्रेमामुळे शिवसैनिक नाराज
By Admin | Updated: October 3, 2014 01:03 IST2014-10-03T01:03:35+5:302014-10-03T01:03:35+5:30
सरदार तारासिंग यांच्याकडून प्रचार रॅलीत शिवसेनाप्रमुखांचा वापरण्यात येणा:या फोटोमुळे शिवसैनिक संभ्रमात पडत असल्याचे चित्र मुलुंड विधानसभा क्षेत्रत पाहावयास मिळत आहे.
भाजपा उमेदवाराच्या ठाकरेप्रेमामुळे शिवसैनिक नाराज
>मुंबई : महायुतीत झालेल्या फुटीनंतरही भाजपाचे उमेदवार सरदार तारासिंग यांच्याकडून प्रचार रॅलीत शिवसेनाप्रमुखांचा वापरण्यात येणा:या फोटोमुळे शिवसैनिक संभ्रमात पडत असल्याचे चित्र मुलुंड विधानसभा क्षेत्रत पाहावयास मिळत आहे. मात्र, हेच ठाकरेप्रेम आमदार तारासिंग यांना महाग पडत असून, त्यांच्या विरोधात मुलुंड शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
मुलुंड विधानसभा क्षेत्रत भाजपाकडून उभे असलेले आमदार सरदार तारासिंग यांनी त्यांच्या प्रचार पत्रकांसह प्रचार रॅलीत वापरण्यात येणा:या वाहनांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा लावल्या आहेत. मात्र केवळ शिवसैनिकांची दिशाभूल करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांचा फोटो वापरण्यात येत असून, हा आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. तारासिंग यांनी तातडीने बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा गाडीवरून आणि प्रसिद्धिपत्रकातून काढाव्यात, अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याचे पडसाद आता सोशल नेटवर्किग साइट्वरही उमटताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)
ठाकरे कुटुंबीयांशी
बांधिलकी कायम
याबाबत आमदार सरदार तारासिंग यांच्याशी संवाद साधला असता, युती असतानाच मी प्रचार सुरू केला होता. यासाठी महायुतीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची छायाचित्रे ठेवली होती. त्याचप्रमाणो प्रचाराचा रथही सजविला होता. दुर्दैवाने सेना-भाजपा युती तुटली. त्यामुळे मी हजारोंच्या संख्येने छापलेली पत्रके फेकून देण्याऐवजी ती वापरली. तसेच सेना - भाजपा युती तुटली तरी ठाकरे घराविषयी माझी आदरयुक्त बांधिलकी मात्र कायम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयोगाकडे तक्रार
या प्रकरणी निवडणूक आयोग आणि मुलुंड पोलीस ठाण्यात आमदार तारासिंग यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. तारासिंग यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे उमेदवार प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.