शिवराज्याभिषेक सोहळा
By Admin | Updated: May 31, 2015 22:48 IST2015-05-31T22:48:55+5:302015-05-31T22:48:55+5:30
भिवंडी शहरातील कासारआळी, अजयनगर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या साक्षीने आज सकाळी शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक सोहळा
भिवंडी शहरातील कासारआळी, अजयनगर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या साक्षीने आज सकाळी शिवराज्याभिषेक उत्सव साजरा करण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासून संभाजीराव भिडे यांच्या मार्गदर्शनाने शिवाजी चौकात हा उत्सव साजरा केला जातो. खा. कपिल पाटील, आ. महेश चौघुले, रूपेश म्हात्रे, महापौर तुषार चौधरी आदी मान्यवर व उत्सव समितीच्या सदस्यांनी या वेळी उपस्थिती दर्शविली.
१ विविध ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा रविवारी उत्साहात संपन्न झाला. शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला उजाळा मिळाला.
२शिवराज्याभिषेक समारोह समिती आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तलावपाळी येथे महापौर संजय मोरे यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
३ या वेळी नगरसेवक संजय वाघुले, उपायुक्त संदीप माळवी, शिवराज्याभिषेक समितीचे अच्युत वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.