रायगडावर उजळल्या शिवज्योती

By Admin | Updated: March 8, 2015 22:32 IST2015-03-08T22:32:47+5:302015-03-08T22:32:47+5:30

शिवछत्रपतींचा विजय असो! शिवाजी महाराज की जय! एकच राजा शिवराजा, अशा घोषणांनी रायगड किल्ला दणाणून निघाला.

Shivajyoti, bright in Raigad | रायगडावर उजळल्या शिवज्योती

रायगडावर उजळल्या शिवज्योती

महाड : शिवछत्रपतींचा विजय असो! शिवाजी महाराज की जय! एकच राजा शिवराजा, अशा घोषणांनी रायगड किल्ला दणाणून निघाला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने किल्ले रायगडावर छत्रपतींच्या समाधीपाशी तमाम महाराष्ट्रातून शिवभक्तांनी आणलेल्या शिवज्योतीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. काल सकाळपासून रायगडावर शेकडो शिवज्योतींचे आगमन झाले. यावेळी ज्योती घेवून धावत जाणाऱ्या शिवभक्तांचा उत्साह दांडगा होता.
शिवाजी चौकात छत्रपतींच्या पुतळ्याचे आज सकाळी विधिवत पूजन करण्यात आले. भगव्या पताका, झेंडे यांनी भगवेमय झाले होते. विविध मंडळांचे चलचित्रांचे देखावे, मिरवणुकीत लेझीम पथकांसह सहभागी झालेले होते. संभाजी मित्र मंडळ सरकर आळी शिवाजी उत्साही मंडळ, काजळपुरा महाराणा प्रताप कुंभार आळी, बालमित्र मंडळ नवी पेठ काकरतळे, शिवप्रेमी मंडळ नवेनगर, तांबट आळी, तांबडभवन या मंडळाचे पथक या मिरवणुकीत सामील झाले होते. जगदंबा झांज पथक संपूर्ण महाडकरांचे या मिरवणुकीत खास आकर्षण ठरले होते. शिवजयंती उत्सव मंडळाचे बिपीन म्हामुणकर, अध्यक्ष स्वप्नील आर्ते यांच्यासह अनेक मान्यवर तसेच शिवप्रेमी मिरवणुकीत सामील झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Shivajyoti, bright in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.