मुंबई - मुंबईत थंडीची चाहूल लागताच प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा डोके वर काढू लागला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला दादरमधील शिवाजी पार्कातील धूळमुक्तीची आठवण झाली आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून पालिकेला शिवाजी पार्क परिसर धूळमुक्त करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे भागधारक, रहिवासी संघटना यांच्या मागण्यांचा विचार करता रविवारी पुन्हा पालिका अधिकारी व आयआयटीच्या तज्ज्ञांनी पार्काची, तेथील मातीच्या नमुन्याची पाहणी केली.
धूळमुक्तीसाठी आयआयटीचे तज्ज्ञ, पालिका अधिकारी आणि रहिवाशांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तूर्त धूळमुक्तीसाठी वाटच पाहावी लागणार आहे.
शिवाजी पार्कमधील लाल मातीच्या धुळीमुळे खेळाडू, नागरिक आणि लहान मुले त्रस्त झाली आहेत. २०१५ मध्ये मैदानातील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी हिरव्या गवताची पेरणी केली होती. गवत तयार करण्यासाठी या मैदानावर मोठ्या प्रमाणावर माती टाकण्यात आली. लाल मातीचा थर कोरडा पडून वाऱ्याने उडतो आहे. त्यामुळे परिसरात प्रदूषण वाढत असून, रहिवाशांना श्वसनाचा त्रास होत आहे.
क्षेत्रफळ : २८ एकरशिवाजी पार्क मैदानाचे महत्त्वशिवाजी पार्क हे मुंबईतील सर्वात मोठे खुले मैदान आहे. एकाच वेळी जवळपास एक लाख लोकांची क्षमता ऐतिहासिक, राजकीय दृष्ट्या आणि क्रीडाक्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे ठिकाण
गवताचीदेखील पाहणीमाती उडू नये म्हणून मैदानात लावलेल्या गचताचीही तज्ज्ञ मंडळींनी रविवारी पाहणी केली. या प्रयोगाचा काही उपयोग होणार नसून, पालिकेने त्यायर पैसे वार्च करू नये, अशी मागणी रहिवाशांनी केली. मात्र, आयआयटी तज्ज्ञांनी त्याबाबत शिफारस केली असून, त्याबद्दल तेच मार्गदर्शन करतील आणि निर्णय घेतील, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
'लाल माती काढून टाका'मागील अनेक वर्षांपासून यावर पालिका विविध उपाययोजना करत आहे, मात्र त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे पालिकेने लाल माती काढून टाकावी, अशी मागणी पुन्हा 'शिवाजी महाराज पार्क एएलएम' या रहिवासी संघटनेने आयआयटी तज्ज्ञांकडे केली आहे.
66शिवाजी पार्क धूळमुक्त करण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयआयटी तज्ज्ञांची मदत आपण घेत आहोत. सर्व भागधारक, स्थानिक, खेळाडू यांच्या समस्या व सूचना दोन्ही समजावून घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार लवकरच सर्वंकष आराखडा तयार कर धूळमुक्तीसाठी अहवाल करणार आहोत.- विनायक विसपुते, सहायक आयुक्त, जी उत्तर विभाग, महापालिका
Web Summary : Mumbai's Shivaji Park dust problem persists. A committee including IIT experts, officials, and residents will seek solutions. Red soil removal is a key demand to alleviate respiratory issues for residents and players.
Web Summary : मुंबई के शिवाजी पार्क में धूल की समस्या बनी हुई है। आईआईटी विशेषज्ञों, अधिकारियों और निवासियों सहित एक समिति समाधान खोजेगी। निवासियों और खिलाड़ियों के लिए श्वसन संबंधी समस्याओं को कम करने के लिए लाल मिट्टी को हटाना एक प्रमुख मांग है।