चेंबूरमध्ये शिवसेनेचा विजय

By Admin | Updated: January 12, 2016 02:40 IST2016-01-12T02:40:06+5:302016-01-12T02:40:06+5:30

चेंबूरच्या प्रभाग क्रमांक १४७ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अनिल पाटणकर यांनी बाजी मारली. पाटणकर यांना ११ हजार ५१७ मते मिळाली असून, काँग्रेसचे उमेदवारा राजेंद्र नगराळे

Shiv Sena's victory in Chembur | चेंबूरमध्ये शिवसेनेचा विजय

चेंबूरमध्ये शिवसेनेचा विजय

मुंबई : चेंबूरच्या प्रभाग क्रमांक १४७ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अनिल पाटणकर यांनी बाजी मारली. पाटणकर यांना ११ हजार ५१७ मते मिळाली असून, काँग्रेसचे उमेदवारा राजेंद्र नगराळे यांना ४ हजार ८९० मते मिळाली, तर शिवसेनेशी बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढलेले उमेदवार नागेश तवटेंना ४ हजार ३१७ मते मिळाली.
काँग्रेसमध्ये असलेल्या अनिल पाटणकर यांनी चार महिन्यांपूर्वी पक्षाचा आणि पदाचा राजीनामा दिला आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यात आली. निवडणुकीसाठी काँग्रेसने राजेंद्र नगराळे आणि शिवसेनेने अनिल पाटणकर यांना उमेदवारी दिली; तर शिवसेनेचे शाखाप्रमुख नागेश तवटे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena's victory in Chembur