मुंबई- मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या येत्या 25 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे शिवाजी शेंडगे यांचा आपला निवडणूक अर्ज आज दुपारी कोकण भवन येथे सादर केला. शेंडगे हे कांदिवली पश्चिम चारकोप येथील एकविरा विद्यालयात शिक्षक आहेत.यावेळी शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते आमदार अॅड.अनिल परब,मीरा-भाईंदरचे सहसंपर्क प्रमुख व आमदार प्रताप सरनाईक, पालघरचे संपर्क प्रमुख व आमदार रवींद्र फाटक,आमदार मनोहर भोईर,मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे,महिला विभागसंघटक रश्मी भोसले,युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर,शिवसेना चिटणीस सुरज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे शिवाजी शेंडगे यांचा निवडणूक अर्ज सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 17:24 IST